JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये येणार अब्दूचा शत्रू हसबुल्ला; लवकरच होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये येणार अब्दूचा शत्रू हसबुल्ला; लवकरच होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

बिग बॉस सोळाची धमाकेदार सुरुवात झाली आहे.हा शो तो सतत ट्रेंडमध्ये आहे. सलमान खानचा शो टीआरपी चार्टमध्येही झपाट्याने वर येत आहे. बिग बॉस 16 सुरु होऊन 3 आठवडे उलटले आहेत. आणि आता शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात

अब्दू-हसबुल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑक्टोबर-   बिग बॉस सोळाची धमाकेदार सुरुवात झाली आहे.हा शो तो सतत ट्रेंडमध्ये आहे. सलमान खानचा शो टीआरपी चार्टमध्येही झपाट्याने वर येत आहे. बिग बॉस 16 सुरु होऊन 3 आठवडे उलटले आहेत. आणि आता शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत चर्चा सुरुआहे की, शोमध्ये पहिला वाईल्ड कार्ड कोण असणार आहे? आतापर्यंत या शोमध्ये वाईल्ड कार्डसाठी अनेक सेलिब्रेटींची नावे समोर आली आहेत, मात्र अद्याप वाइल्ड कार्डच्या रुपात शोमध्ये कोण येणार हे स्पष्ट झालेलं नाहीय.दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की अब्दू रोजिकचा शत्रू समजला जाणारा हसबुल्लाह मागोमेदोद शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेऊ शकतो. आणि जर निर्मात्यांनी खरंच असं केलं तर शोचा टीआरपी देखील वाढेल यात शंका नाही. कारण, अब्दू हा या सीजनचा असा स्पर्धक आहे, जो प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरला आहे. अशा स्थितीत अब्दू आणि हसबुल्लाह यांच्यातील लढत पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता वाटेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अब्दू शत्रू समजल्या जाणाऱ्या हसबुल्लाला शोमध्ये सहभागी होण्यासाठी वेळ लागू शकतो.यामागे कारणंही तसंच आहे. याचं पहिलं कारण म्हणजे हसबुल्ला दुबईत राहतो. त्यामुळे निर्माते त्याला लवकरात लवकर शोमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, दुसरीकडे, हसबुल्लाहलासुद्धा हिंदी येत नसल्याचीही एक मोठी समस्या आहे. म्हणजेच हसबुल्लाला शोमध्ये एन्ट्री घेण्यासाठी वेळ लागू शकतो.जर ह्सबुल्ला बिग बॉसच्या घरात सहभागी झाला तर प्रेक्षकांना अब्दू आणि ह्सबुल्लामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार हे नक्की. **(हे वाचा:** Bigg Boss 16: सलमान खानने सोडलं बिग बॉस 16? करण जोहर असणार नवा होस्ट ) अशा परिस्थितीत आता या शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेतंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवाळीच्या पुढच्या आठवड्यात श्रीजिता डे पुन्हा एकदा वाईल्ड कार्डच्या रुपात शोमध्ये परत येऊ शकते. श्रीजीता डे ही यंदाच्या सीजनची पहिली एलिमिनेट झालेली स्पर्धक होती. सूत्राचे म्हणणे आहे की निर्मात्यांना वाटते की अभिनेत्री या शोसाठी एक चांगली स्पर्धक आहे, परंतु तिला शो नीट समजून घेण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळेच तिला पुन्हा एकदा शोमध्ये परत आणलं जाऊ शकत. श्रीजीता परत आली तर टीना आणि तिच्यामध्ये पुन्हा एकदा वादविवाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

करण जोहरची एन्ट्री- सलमान खानला डेंग्यू झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे तो ‘बिग बॉस 16’चे पुढील काही भाग होस्ट करणार नाही. अशातच सलमानला रिप्लेस म्हणून करण जोहरला बिग बॉस होस्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान करण जोहर सलमानलाही नकार देऊ शकला नाही. कारण तो नेहमीच कठीण काळात करण जोहरच्या पाठीशी उभा राहिला आहे.करण जोहरने शोमध्ये येताच स्पर्धकांची चांगलीच खरडपट्टी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या