मुंबई, 25 नोव्हेंबर : टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉस 13 प्रत्येक दिवशी काही ना काही कारणानं चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात रोज नवे वाद आणि भांडणं यामुळे सध्या हा शो टीआरपी लिस्टमध्ये आला आहे. पण लवकरच या घरातले एकमेकांचे शत्रू सिद्घार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई रोमान्स करून प्रेक्षकांना धक्का देणार आहेत. या दोघांचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स करताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडीओ शहनाझ गिलनं शूट केला आहे. बिग बॉसच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर नुकताच हा व्हिडीओ शेअर केला गेला. त्यानंतर हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला रोमान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, दिल से दिल तक बेडरुम पासून ते स्विमिंग पूल पर्यंत सिद्धार्थ आणि रश्मीचा रोमान्स. हा एपिसोड आज रात्री प्रसारित केला जाणार आहे. हा व्हिडीओ शहनाझ गिल शूट करताना दिसत आहे. तर रश्मीची मैत्रिण देवोलिना त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या टाकताना दिसत आहे.
असं म्हटलं जातंय की हा एका टास्कचा भाग आहे. ज्यात शहनाझला डायरेक्टर बनवण्यात आलं असून सिद्धार्थ-रश्मीला रोमँटिक सीन्स देण्यास सांगण्यात आलं आहे. या व्हिडीओमुळे प्रेक्षक हैराण झाले आहेत कारण, रश्मी नेहमीच सिद्धार्थ तिचा मोठा शत्रू असल्याचं सांगताना दिसते. तर दुसरीकडे शहनाझ आणि सिद्धार्थ यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्यामुळे मग हा असा टास्क देण्याची गरज काय असा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. ============================================================