JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / न्यूड फोटोंवर टीव्ही स्टारने दिलं स्पष्टीकरण, VIDEO शेअर करत म्हणाली,'माझ्यात दैवी शक्ती'

न्यूड फोटोंवर टीव्ही स्टारने दिलं स्पष्टीकरण, VIDEO शेअर करत म्हणाली,'माझ्यात दैवी शक्ती'

सोशल मीडियावर न्यूड फोटो आणि सेक्सबाबतचे व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं होतं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 एप्रिल: बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सोफिया हयातने सोशल मीडियावर स्वत:चे न्यूड फोटो शेअर केले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. फोटो आणि सेक्ससंदर्भातील व्हिडीओबद्दल तिने आता ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. सोफियानं इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ती म्हणते की, ‘येशू ख्रिस्ताचा अवतार, महिला इसा मसिह म्हणून लोक मला ओळखत नाहीत याचं खूप वाईट वाटतं. तरीही मी एक प्रबुद्घ व्यक्ती आहे. मला देवाने अनेक शक्तीही दिल्या आहेत. याबाबत सोफियानं एक खळबळजनक असा दावाही केला आहे. त्यात ती म्हणते की, मीडियातील एका व्यक्तीला माझ्यातील शक्तीबाबत माहिती आहे. त्याला मी हे गुपित ठेवायला सांगितलं होतं. त्यानं मला शिवलिंगात पाहिलं होतं आणि त्याला माझ्या शक्तींचा अंदाज आहे असा दावा सोफियानं या व्हिडिओमध्ये केला आहे. सोफियानं थेट भगवान बुद्धांचा उल्लेख करत म्हटलं की, त्यांनी आपल्या पायावर स्वस्तिक ठेवलेलं चालतं पण मी ठेवलं तर तुम्हाला अडचण निर्माण होतात. माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं आणि हे मी उघडपणे बोलत आहे’ असंही यावेळी सोफिया व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

सोफिया पुढे म्हणते की, हे तसंच आहे जसं जुन्या काळात व्हायचं. ज्या महिलांचा ताकद वाढायची त्यांना मारंल जायचं. जसं इसा मसीहला मारलं होतं. अनेक वर्षे लोकांनी मदर मेरीचा पाठलाग केला होता. तुम्हाला काय वाटतं मी वेगळी आहे काय़ तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी लढत आहात जे पुर्णत: देवत्व आहे आणि लोक त्याला तोडण्यासाठी तयारी करत आहेत. हे करण्याऐवजी लोकांनी अडल्ट फिल्मचे प्रमोशन बंद करायला हवं. जर इन्स्टाग्राम आणि ट्विटर अशा लोकांचं ऐकत असेल तर ते महिलांची तोंडं बंद करत आहे असा आरोपही सोफियाने केला. हे वाचा : मुंबई-पुण्यात सगळ्या सवलती रद्द; नागरिक लॉकडाऊन पाळत नसल्यामुळे निर्णय सोफियाने तिचे अनेक न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये ती ॐ च्या पेंटिंगसमोर मान वाकवून उभा असल्याचं दिसतं. त्यानंतर आणखी एक फोटो शेअर केला होता. या फोटोंमुळे आणि स्वत: देव असल्याचा दावा केल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. हे वाचा : लॉकडाऊनमुळे ऑनलाइन डेटिंग करताय, ‘या’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या