अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सध्या कोणत्याही अभिनय प्लॅटफॉर्मवर दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सई सतत तिचं फोटोशूट शेअर करत असते. यावेळी सईने नवरा तिर्थदीप रॉयसोबत रोमँटिक फोटोशूट केलं आहे. पाहा दोघांचं हटके फोटोशूट
सईचे अनेक फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात. यावेळी सईने तिच्या नवऱ्यासोबत कमाल फोटोशूट केलं आहे.
दोघांनी पैठणीचे आऊटफिट घातले आहेत. सईने ऑफ व्हाइट कलरचा घागरा तर तिर्थदीपने व्हाइट कलरचा सदरा लेहंगा घातला आहे. या फोटोत दोघे रोमँटिक होऊन डान्स करताना दिसत आहेत.
घागऱ्यावर सईने ट्रेडिशन लूक केला असून घागऱ्यावर रेड कलरची किनार असलेली पैठणीची ओढणी घेतलीय. तर तिर्थदीपनेही तिला मॅचिंग असं पैठणीचं जॅकेट घालतं आहे.
महाराष्ट्राचं महावस्त्र असलेल्या पैठणीच्या आऊटफिटमध्ये सई आणि तिर्थदीप फारच गोड आणि सुंदर दिसत आहेत.