JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / भारती सिंहनं सर्वांसमोर पापाराझींकडे मागितला प्रसूती खर्च; वाचा VIRAL VIDEO मागील सत्य

भारती सिंहनं सर्वांसमोर पापाराझींकडे मागितला प्रसूती खर्च; वाचा VIRAL VIDEO मागील सत्य

कॉमेडियन भारती सिंहच्या (Bharti Singh) घरी लवकरच पाळणा हलणार आहे. नुकतंच तिनं यूट्यूबवर खास पद्धतीनं तिच्या प्रेग्नेंसीची (Bharati Singh Pregnancy) माहिती दिली आहे .

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर-   कॉमेडियन भारती सिंहच्या  (Bharti Singh)  घरी लवकरच पाळणा हलणार आहे. नुकतंच तिनं यूट्यूबवर खास पद्धतीनं तिच्या प्रेग्नेंसीची    (Bharati Singh Pregnancy)  माहिती दिली आहे . सध्या भारती तिच्या प्रेग्नन्सीला एन्जॉय करत आहे. नेहमी आपल्या हटके स्टाईलनं लोकांना हसवणारी भारती सिंह अलीकडंच पापाराझींकडून नुकसानभरपाई मागताना दिसली.तिनं प्रत्येक पापाराझीकडून नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम मागितली आहे. तिनं यामागचं कारणही सांगितलं आहे की, ती हे नुकसान का मागत आहे. भारती सिंह एप्रिल 2022 च्या अखेरीस आई होणार आहे. भारतीनं ही बातमी शेअर करण्यापूर्वीच भारती आणि हर्ष आता आईबाबा होणार असल्याची बातमी पसरली होती. मीडियामध्ये ही बातमी व्हायरल झाल्यानंतर भारतीनं तिच्या प्रेग्नेंसीचा सस्पेन्स आधीच मीडियानं संपवला आणि तिचं गुपित उघड केलं होतं. नुकताच विरल भयानीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारती सिंह आपल्या प्रेग्नेंसीचं सस्पेन्स उघड केल्यबद्दल पापाराझींकडून नुकसान भरपाईची मागणी करताना दिसत आहे.हा मजेशीर व्हिडीओ आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांना भारतीचा हा हटके अंदाज फारच पसंत पडत आहे.

संबंधित बातम्या

खूपच मजेशीर आहे हा व्हिडीओ- विरल भयानीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये भारती सिंह पापाराझींना नमस्कार करत कारमध्ये बसते. आणि मजेत म्हणते मलाच मत द्या. देणार ना?.. त्यांनतर एक पापाराझी भारतीला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारतो. यावर आपल्या हटके अंदाजात मजेशीर उत्तर देत भारती म्हणते, ‘मग काय चूक केली का मूल होणार आहे तर?’ (हे वाचा: 83 Tax Free: रणवीरचा ‘83’ या राज्यात टॅक्स फ्री; कमी पैशात पाहता येणार चित्रपट ) भारतीने का मागितले 50 हजार- कारमधून उतरल्यानंतरही पापाराझी तिची पाठ सोडत नाहीत. प्रश्नांची उत्तरे देताना ती म्हणते- ‘मूल कोणत्या हॉस्पिटलमध्ये होणार ते मी सांगेन. तुमच्या सर्वांकडून 50-50 हजार प्रसूतीचा खर्च यायला हवा. कारण आम्हाला स्वतः माझ्या प्रेग्नेन्सीची बातमी न्यूज द्यायची होती. परंतु तुम्ही आधीच ही बातमी छापून आमचा सस्पेन्स संपवला. मग आता तुम्ही नुकसान भरपाई म्हणून 50-50 हजार पाठवून द्या. मी तुम्हाला सांगेन की कोणत्या हॉस्पिटलमध्ये माझी प्रसूती होत आहे. प्रत्येक पापाराझीकडून प्रति व्यक्ती 50 हजार रुपये घेणार आह.’ हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या