भारती-हर्ष
मुंबई, 29 ऑक्टोबर- कॉमेडियन भारती सिंग आणि पती-होस्ट-लेखक हर्ष लिंबाचिया यांच्याविरुद्ध एनसीबीने आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलं आहे. या दोघांविरुद्ध न्यायालयात 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 2020 मध्ये दोघांना एनसीबीने अटक केली होती. दोघेही जामिनावर बाहेर आहेत. जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जच्या सेवनाची विविध प्रकरणे समोर आली होती. एनसीबीने तपास सुरु केला तेव्हा अनेक मोठे सेलिब्रिटीची नवे यामध्ये समोर आली होती. NCB ने ड्रग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसह अनेक मोठ्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती. याच दरम्यान NCB ने 21 नोव्हेंबर 2020 मध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले होते. यामध्ये भारती आणि हर्षच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने या दाम्पत्याला अटक केली होती. (हे वाचा: प्रसिद्ध निर्मात्याला मुंबई पोलिसांनी केली अटक; पत्नीला कारने चिरडल्याचा आरोप ) NCB ने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांना न्यायालयात हजर केलं होतं आणि त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, 15 हजार रुपयांची सिक्युरिटी मनी जमा केल्यानंतर या दाम्पत्याला जामीन मिळाला होता. तेव्हापासून दोघेही जामिनावर बाहेर आहेत. मात्र, फिर्यादीचे म्हणणं न ऐकता जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा एनसीबीने न्यायालयात केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती सिंगला अटक करण्यात आली, त्यावेळी ती प्रेग्नेंट होती. या एप्रिलमध्ये तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारतीच्या मुलाचं नाव लक्ष्य असं आहे. ज्याला ती प्रेमाने गोला म्हणते. जामिनावर बाहेर आल्यानंतर आणि प्रेग्नेंसीतही ती टीव्ही शो होस्ट करताना दिसली होती. प्रेग्नेंसीमध्ये काम करण्याबद्दल तिने म्हटलं होतं की, तिला स्वतः ला सतत व्यस्त ठेवायचं होतं. आणि इतर कोणत्याही तणावापासून दूर ठेवायचं होतं. त्यामुळे ती विविध प्रोजेक्ट्समध्ये काम करत होती.
भारती सिंग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत विविध आऊटफिट्समध्ये आपलं फोटोशूट करत असते. तसेच भारती आपले विविध विनोदी रिल्स शेअर करत असते. लेकाला जन्म दिल्यापासून भारती आणि हर्ष प्रचंड आनंदी आहेत. भारती सतत आपल्या लेकाचा विविध रुपात गोड फोटोशूट करत असते. भारती आणि हर्षप्रमाणेच त्यांच्या लेकालासुद्धा चाहते प्रचंड प्रेम देत आहेत. लक्ष्यच्या फोटो आणि व्हिडिओंवर चाहते भरभरुन लाईक्स आई कमेंट्स देत असतात.