JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / एकेकाळी पती पासून वेगळी झाली होती सलमानची पहिली हिरोईन, 30 वर्षांनी केला धक्कादायक खुलासा

एकेकाळी पती पासून वेगळी झाली होती सलमानची पहिली हिरोईन, 30 वर्षांनी केला धक्कादायक खुलासा

‘मैंने प्यार किया’ या सिनेमाची अभिनेत्री भाग्यश्रीनं लग्नाच्या 30 वर्षांनंतर पतीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी : 1989 मध्ये आलेल्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री भाग्यश्रीनं लग्नाच्या 30 वर्षांनंतर पती हिमालय दासानी आणि आपल्या लग्नाविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमामुळे भाग्यश्री रातोरात स्टार झाली होती. अभिनेत्री शक्यतो त्यांच्या करिअरच्या उभारत्या काळात लग्न करण्याचं टाळतात. मात्र भागश्री याला अपवाद ठरली. तिनं या सिनेमाच्या रिलीजनंतर अवघ्या वर्षभरातच प्रोड्युसर हिमालय दासानी यांच्याशी लग्न केलं. पण आता लग्नानंतर तब्बल 30 वर्षांनी भाग्यश्रीनं तिच्या बॅडपॅच बद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. हिमालय दासानी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्म मेकर आणि प्रोड्युसर आहेत. भागश्री आणि हिमालय बॉलिवूडच्या आयडियल कपलमध्ये गणले जातात. मात्र नुकतंच एका इव्हेंटमध्ये त्याचं हे नातं एवढाही परफेक्ट नव्हता जेवढं लोक समजतात असं म्हटलं आहे. व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात भाग्यश्री असं म्हणताना दिसत आहे की, हो हिमालय माझं पहिलं प्रेम आहे. मी त्यांच्याशी लग्न केलं पण एक वेळ होती जेव्हा आम्ही काही काळासाठी वेगळे झालो होतो. ब्रेकअपनंतर सर्वांसमोर स्टेजवर ढसाढसा रडली अभिनेत्री, सोशल मीडियावर Video Viral

भागश्री म्हणाली, ‘अशी एक वेळ होती जेव्हा दीड वर्षासाठी मी आणि हिमालय एकमेकांपासून वेगळे झालो होतो. त्यावेळी माझ्या मनात असा विचारही आला की, जर ते मला भेटलेच नसते आणि मी त्यांच्याशी लग्न केलं नसतं तर. मला आजही आठवतं. हे सर्व जेव्हा मला आठवतं तेव्हा आजही मला खूप भीती वाटते.’ भाग्यश्रीच्या या खुलाशानं सर्वांना धक्का बसला आहे. लग्नाच्या 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाग्यश्री तिच्या लग्नाविषयी मोकळेपणानं बोलली. रजनीकांत-बियर ग्रिल्स यांच्या ‘इन टू द वाइल्ड’चा धमाकेदार टीझर रिलीज, पाहा VIDEO भाग्यश्री आणि हिमालय यांच्या लव्ह स्टोरी बद्दल बोलायचं तर हे दोघं शाळेत असतानापासून एकमेकांना ओळखत होते. तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र असं म्हटलं जातं की भाग्यश्रीचे कुटुंबीय तिच्या लग्नाच्या विरोधात होते. पण मग सूरज बडजात्या, सलमान खान आणि काही जवळच्या मित्रमंडळींनी त्यांचं लग्न लावून दिलं मात्र याचा भाग्यश्रीच्या करिअरवर परिणाम झाला. ‘मैंने प्यार किया’नंतर तिला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळवता आलं नाही. सोनाक्षी सिन्हानं केला मोठा खुलासा, ‘या’ कलाकारांना लगावली चपराक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या