अभिनेत्री शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre) अंगुरी भाभी बनण्यासाठी व ते पात्र खरं दिसण्यासाठी काय कराव लागत याविषयी तसेच प्रोफेशनल आणि वयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत. पाहा काय म्हणाली शुभांगी.
अभिनेत्री शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre) अंगुरी भाभी बनण्यासाठी व ते पात्र खरं दिसण्यासाठी काय कराव लागत याविषयी तसेच प्रोफेशनल आणि वयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत. पाहा काय म्हणाली शुभांगी.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हेै (Bhabiji Ghar Par Hai) प्रेक्षकांची नेहमीच आवडती मालिका राहिली आहेय यातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना आपलसं व तितकच मनोरंजक वाटत. अंगुरी भाभी हे पात्र साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने अंगुरी भाभीला रियल टच देण्यासाठी काय काय कराव लागत याविषयी सांगितलं आहे.
शुभांगीने अंगुरी भाभीच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे. सुरुवातीला हे पात्र अभिनेत्री शिल्पा शिंदे साकारत होती. पण तिने मध्येच मालिका सोडल्यानंतर हे पात्र शुभांगीकडे आलं आणि तिने त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला.
तिने सांगितलं की हे पात्र साकारताना ती पूर्णपणे या पात्रात स्वतःला सामावून घेतै. जर अंगूरी काही विनोदी बोलणार असेल तर ती देखिल प्रमाणेच विचार करायला सुरुवात करते.
शुभांगीने सांगितलं कामा व्यतिरिक्तही वैयक्तिक तिच्याकडे ६०० हून अधिक झुमक्यांच्या जोड्या आहेत. जे ती अंगूरी भाभी साकारताना कधी कधी घालते ज्यामुळे कामाला पर्सनल टच मिळतो.
शुभांगीने सांगितलं तिला कानतले फार आवडतात. झुमक्यांसाठीचं तिच प्रेम हे आता एखाद्या जिद्द बनलं आहे.