JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रॅपर बादशाहने व्यक्त केलं दु:ख, सांगितलं 'या' कारणामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड!

रॅपर बादशाहने व्यक्त केलं दु:ख, सांगितलं 'या' कारणामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड!

आतापर्यंत बादशाहने एकापाठोपाठ अनेक हीट गाणी दिली आहे. जवळपास प्रत्येक मोठ्या चित्रपटात बादशाहचं गाणं ऐकाला मिळतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : गाणे आणि रॅपद्वारे अल्पावधित लोकप्रिय झालेल्या रॅपर बादशाह(Badshah) चं करिअर सध्या सातवे आस्मानवर आहे.  आतापर्यंत बादशाहने एकापाठोपाठ अनेक हीट गाणी दिली आहे. जवळपास प्रत्येक मोठ्या चित्रपटात बादशाहचं गाणं ऐकाला मिळतं. पण, आता बादशाहने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी जाहीर केल्या आहे. यात त्याने आपली गर्लफ्रेंड का सोडून गेली? याचा खुलासा केला आहे. रॅपर बादशाहने पिंकविला संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं.  ‘मी माझ्या आयु्ष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने साजरा करतो. पण आयुष्यात असेही काही दिवस आले तेव्हा जवळ पैसेही नव्हते आणि मला फरशीवरही झोपावं लागलं’, असा अनुभवही त्याने सांगितला.  ‘मला रॅपर व्हायचं हे मी ठरवलं होतं. पण कुटुंबाला समजून सांगणे, जरा कठीण होतं. कारण, रॅपर म्हणून करिअर करावं, याला त्यांचा विरोध होता. पण, तरीही मी माझा मार्ग निवडला, असंही त्यांनी सांगितलं.

बादशाहने आपल्या लव्ह लाईफबद्दलही खुलासा केला. बादशाहची गर्लफ्रेंडही लाँग रिलेशनशिपनंतर सोडून गेली होती. बादशाहने रॅपर म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली. बादशाह आणि त्याची गर्लफ्रेंड हे जवळपास 20 वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. पण जेव्हा बादशाहने रॅपरमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचा हा निर्णय तीला आवडला नाही. रॅपर म्हणून करिअर चांगलं नाही, असा तीचा दावा होता. त्यामुळे मला मानसिकरित्या खूप अडचणींचा सामना करावा लागला, असंही बादशाहने सांगितलं.

बादशाहला आपल्या आई-वडिलांनाही आपल्या करिअरबद्दल समजून सांगण्यासाठी जवळपास 5 वर्ष लागले होते. काही दिवसांनंतर मी एक महागडी कार खरेदी केली आणि घराच्या दारासमोर उभी केली, तेव्हा वडिलांनी मला विचारले की, ‘ही कुणाची कार आहे?’ जेव्हा त्यांना ही माझी कार माझी असून गाण्यातून पैसे कमावले आणि खरेदी केली. यावर त्याच्या वडिलांनी गाण्यातूनही पैसे मिळतात? असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित करून कौतुक केलं.  बादशाहने संगीत क्षेत्रात म्हणून 2006 पासून करिअरला सुरूवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या