मुंबई, 1 नोव्हेंबर : मागच्या काही दिवसापासून प्रेक्षक झी मराठी पुरस्कार सोहळ्याची (Zee Marathi Award 2021 )वर वाट पाहत होते. शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी झी मराठी वाहिनीवर हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याला कतरिना कैफ, रोहित शेट्टी तसेच गोविंदा सारख्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यामुळे ह्या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढलेली पाहायला मिळाली. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेच्या कलाकारांची मांदिआळी या सोहळ्याला चांगलीच सजली होती. पण ह्या पुरस्काराने काही प्रेक्षक मात्र काहीसे नाराज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. भावी सून, भावी सासू अशी सुद्धा कॅटेगिरी पुरस्कारासाठी ठेवण्यात आली होती. ही कॅटेगिरी बघून प्रेक्षकच गोंधळात पडल्याचे पाहायला मिळाले. भावी सून म्हणून स्वीटूला हा पुरस्कार मिळाला तर भावी सासू म्हणून ओमच्या आईला म्हणजेच शकूला पुरस्कार दिला गेला. मुळात इथे प्रश्न हा निर्माण होतो की, स्वीटूचे लग्न हे ओम बरोबर झाले असते तर स्वीटू शकूची सून झाली असती. पण आता ट्रॅकप्रमाणे तिचे लग्न मोहितसोबत झाले आहे. मग या पुरस्कारासाठी स्वीटू मानकरी कशी ? या कॅटेगिरीसाठी पुरस्कार द्यायचाच होता तर तो ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतील आदितीला द्यायला हवा होता. भावी सासू म्हणून सिद्धूच्या आईला हा पुरस्कार देणे योग्य राहिले असते ..कमेंट करून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इथे उत्कृष्ट सासरे म्हणून सिद्धूचे वडील देखील होते मग हा पुरस्कार दादा साळवींना का दिला. स्वीटूच लग्न जर मोहित सीबत झालं तर सासू आणि सुनेचा पुरस्कार स्वीटू आणि शकूला का दिला?.. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट वडिलांचा पुरस्कार देशपांडे सरांना देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार नेहाला देण्यात आला याबाबत तक्रार नसली तरी वरील सर्व पुरस्कार योग्य व्यक्तीला दिले नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. ज्या कलाकारांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती त्या कलाकारांना मात्र योग्य पुरस्कार देण्यापासून डावलण्यात आले असेच आता म्हटले जात आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील कलाकारांना देखील योग्य तो पुरस्कार द्यायला हवा होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. शिवाय भावी सून, भावी सासू हे पुरस्कार कसे दिले याबाबत देखील प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वाचा : सारा-जान्हवीची केदारनाथ तीर्थयात्रा सोशल मीडियावर हिट; फोटो व्हायरल यासोबतच काही नेटकरी या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड कलाकार बोलवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा काहीसा कंटाळवना होता अशी कमेंट केली. श्रेयस तळपदेने जरी गंमतीने कतरिनाचे पाय धरले असले तरी मराठी प्रेक्षकांना हे अजिबात रूचलेले नाही. एका नेटकऱ्याने यावरून म्हटलं आहे की,श्रेयस तळपदेने जरी अवॉर्ड घेतल्यावर कतरिन च्या पायाला हात लावून नमस्कार केला..toooo much.. फारच विचित्र वाटलं ते.. इतका स्वाभिमान गुंडाळून ठेवायची काय गरज.. तिने असे काय मोठे तीर मारले आहेत की त्याने तिचे पाय धरावे??? बघताना आम्हालाच लाज वाटली..अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, इतकी वर्ष झाली ही बाई बॉलिवूड मध्ये आहे पण अजून धड हिंदी देखील बोलू शकत नाही… म्हणजे किती कमी बुद्धी आहे बघा हीची…तर आणखी एकाने म्हटलं आहे की, किती कौतुक या बॉलिवूडवाल्यांचे…असं म्हणत नेटकऱ्याने नाराजी व्यक्त केली.
तर दुसरीकडे काही नेटकऱ्याने या पुरस्कार सोहळ्याला पसंती देखील दर्शवली आहे. काहींना बॉलिवू़ड कलाकारांचे कौतुक देखील केले आहे. एका नेटकऱ्याने कडक भाग …होता अशा देखील प्रतिक्रिया दिली आहे. पुरस्कारावरून जरी प्रेक्षकांनी नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असली सोहळ्यातील डान्स नंबर असतील किंवा सोहळ्याचे निवेदक असतील सर्वांनी झीच्या या सोहळ्याचे कौतुकच केले आहे.