JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Girgaonchi Vaari: गिरगावची लेक रंगली वारीच्या रंगात! अभिनेत्रीनं घेतला वारीचा मनसोक्त आनंद

Girgaonchi Vaari: गिरगावची लेक रंगली वारीच्या रंगात! अभिनेत्रीनं घेतला वारीचा मनसोक्त आनंद

महाराष्ट्रात सर्वत्र सध्या आषाढी एकादशीचा ( Ashadhi Ekadashi) माहोल आहे. पंढरपूरात ( Pandharpur) वारकरी ( Varkari) हळ हळू दाखल होत आहेत. पंढरपूरची वारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तशीच मुंबईच्या गिरवारची वारी (girgaonchi vaari) देखील प्रसिद्ध आहे. मुंबईतील वारकरी या गिरगावच्या वारीत सहभागी होतात. अनेक वर्षांची पंरपरा या गिरगावच्या वारीला लाभली आहे. स्वामिनी फेम अभिनेत्री कुंजिका काळवीट ( Kunjika Kalvit) गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती. कुंजिकानं वारीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

0111

स्वामिनी मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कुंजिका काळवीट नुकतीच गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती.

जाहिरात
0211

कुंजिका ही मुळची गिरगावातील असल्यानं तिच्यासाठी ही वारी फारच जवळची आणि महत्त्वाची आहे.

जाहिरात
0311

गिरगावच्या वारीचा अनोखा थाट यावेळी पाहायला मिळाला. करकटेवरी ठेवून उभ्या छोट्या विठ्ठल आणि रुक्कमीणीचं दर्शन घेता आलं.

जाहिरात
0411

कुंजिकानं यावेळी फार साध्या लुकमध्ये वारीत सहभागी झाली होती.

जाहिरात
0511

टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर कुंजिकानं वारीत सहभाग घेतला.

जाहिरात
0611

मोठ्या उत्साहात कुंजिका वारीत भजन आणि ओव्या गाताना दिसली.

जाहिरात
0711

कुंजिकानं महिला मंडळांबरोबर पारंपारिक फुगड्याही घातल्या.

जाहिरात
0811

कुंजिकाला आपण नेहमीच पारंपारिक लुकमध्ये पाहत आलो आहोत. तिचा हा लुक चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतो.

जाहिरात
0911

गिरगावातील गुढीपाडव्याचा शोभायात्रेतही कुंजिकाला नटून थटून कधी झांजा वाजवताना तर कधी ढोल वाजवताना आपण पाहिलं आहे.

जाहिरात
1011

कुंजिकानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं स्मित हास्य पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

जाहिरात
1111

स्वामीनी या मालिकेशिवाय कुंजिका 'चंद्र आहे साक्षीला', 'ती परत आलीय' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या