मुंबई, 18 सप्टेंबर- लोकप्रिय गायिका आशा भोसले या वयातही अतिशय सक्रिय असतात. आयुष्याच्या प्रत्येक लहान-लहान गोष्टींमध्ये त्या आनंद शोधत असतात. आशा भोसले आपली लाडकी नात जनाई भोसलेसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत. नात जनाई भोसलेचं आजी आशा भोसलेसोबत फारच छान बॉन्डिंग आहे. या दोघी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे राहतात. जनाई सतत आशा भोसले यांना त्यांच्या आवडत्या जपानी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाते. या आजी-नात सतत एकत्र दिसून येतात. मुंबईचा पावसाचा प्रत्येकालाच अनुभव घ्यायचा असतो. असंच काहीसं आशाजी आणि त्यांच्या नातीनेसुद्धा केलं आहे. नुकतंच मुसळधार पावसातही या दोघी मुंबईतील वांद्रे येथील जपानी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना दिसून आल्या. यावेळी जनाई आजी आशा भोसलेंचा हात धरुन त्यांना आधार देताना दिसून आली. दरम्यान आशा ताई माध्यमांना स्मितहास्य देऊन प्रतिसाद देताना दिसल्या. जनाईला माहित आहे की, तिच्या आजीला वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवायला आणि खायला आवडतात. विशेषत: आशा ताईंना जपानी खाद्यपदार्थ प्रचंड आवडतात. त्यामुळे नात जनाईनं आजीला जपानी हॉटेलमध्ये डिनरसाठी नेणं साहजिक आहे. या आजी आणि नात एकमेकांसोबत खूप वेळ घालवतात आणि दोघींनाही स्वयंपाकाची खूप आवड आहे. त्यामुळे त्यांचं चांगलं जमतं. आशा ताई गायिकाच नव्हे तर एक उद्योजिकादेखील आहेत. त्या यशस्वीरित्या रेस्टॉरंट्स चेन चालवत आहेत. आपले खाद्यपदार्थ जगभरात पसंत केले जातात, असा त्या अभिमानाने दावा करतात, परंतु दिवंगत बहीण गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या हाताने बनवलेली ‘कोथिंबीर मटण’ त्यांना सर्वात स्वादिष्ट वाटतं असे.
**(हे वाचा:** जेह तर तैमुरच्या एक पाऊल पुढे; करीनाच्या लेकाने कॅमेरा पाहून केलं असं काही, पाहा VIDEO ) आहारावर नियंत्रण ठेवायचं झाल्यास, सकाळी हलका नाश्ता करण्याचा सल्ला आशा भोसले देतात. आणि दुपारच्या जेवणासाठी दोन तळलेली अंडी, चपात्या आणि भाज्या असलेले योग्य जेवण घेण्याचं आवाहन त्या करतात. काहीवेळा त्या आपल्या आवडत्या जपानी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी नात जनाई भोसलेसोबत रात्रीच्या जेवणासाठी वांद्रे येथील मिझू रेस्टॉरंटमध्ये जातात.