नवी दिल्ली, 31 मे- ज्येष्ठ गायिका आशा भोसले गुरुवारी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित राहिल्या होत्या. या सोहळ्याला आठ हजारांहून अधिक लोक उपस्थित होती. बॉलिवूडमधील अनेक नावाजलेले सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते. या सगळ्यात समारोह संपल्यानंतर आशा भोसले यांना राष्ट्रपती भवनातून बाहेर पडण्यास फार त्रास झाला. त्या गर्दीत अडकल्या होत्या आणि स्मृती इराणी वगळता कोणीही त्यांच्या मदतीला धावून आलं नाही. याबद्दलचा अनुभव आशा ताईंनी ट्विटरवरून स्पष्ट केलं. कपिल शर्मापासून कंगना रणौतपर्यं या कलाकारांनी लावली मोदींच्या शपथ ग्रहणाला हजेरी
आशा यांनी ट्विटरवर स्मृती इराणी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘पंतप्रधानांच्या शपथ समारंभानंतर मी गर्दीत अडकले होते. स्मृती इराणी सोडून कोणीही माझ्या मदतीला आलं नाही. स्मृतीला माझी स्थिती कळली आणि मी घरी सुरक्षित पोहोचेन याची काळजी तिने घेतली. ती काळजी घेते आणि म्हणून ती जिंकली.’ स्मृती यांनी आशा ताईंच्या ट्वीटला रिप्लाय देत हात जोडलेले इमोजी शेअर केले.
‘या’ आजाराने त्रस्त होत्या तनुजा, करावी लागली सर्जरी दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक कार्यक्रमात देशातीलच नाही तर परदेशातील ही अनेक बडे नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अर्ध बॉलिवूडही या कार्यक्रमाला उपस्थित होतं. यावेळी कंगना रणौत, शाहिद कपूर- मीरा राजपूत, करण जोहर, कपिल शर्मा यांच्यासह अनिल कपूर, दिव्या खोसला, अनुपम खेर, राजकुमार हिरानी, आनंद एल राय यांसारखे सेलिब्रिटीही कार्यक्रमाला उपस्थित होते. VIDEO : ईश्वराची शपथ न घेता रामदास आठवलेंनी अशी घेतली शपथ