JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sameer Wankhede: शेवटच्या क्षणी जोडण्यात आलं शाहरुखच्या लेकाचं नाव, महागडी घड्याळे, फॉरेन ट्रिप्सबाबत काय म्हणाले वानखेडे?

Sameer Wankhede: शेवटच्या क्षणी जोडण्यात आलं शाहरुखच्या लेकाचं नाव, महागडी घड्याळे, फॉरेन ट्रिप्सबाबत काय म्हणाले वानखेडे?

Aryan Khan-Sameer Wankhede News: गेल्यावर्षी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगासुद्धा अडकला होता. 28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं.

जाहिरात

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे अडचणीत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे- गेल्यावर्षी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगासुद्धा अडकला होता. 28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. दरम्यान आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. मुलगा आर्यन खान ला सोण्यासाठी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे.त्यामुळे सध्या त्यांची विविध प्रकारे चौकशी सुरु आहे. विशेष चौकशी पथकाच्या (SET) अहवालावर विश्वास ठेवला तर ते अधिक अडचणीत सापडले आहेत. CNN-News18 ने एसईटी अहवालाचा विशेष तपशील ऍक्सेस केला आहे. ज्याच्या आधारावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) समीर वानखेडे आणि NCB मुंबई झोनच्या त्यांच्या दोन माजी कनिष्ठांविरुद्ध एफआरआयदेखील दाखल केला होता.या अहवालानुसार, वानखेडे आणि त्यांच्या कनिष्ठांनी ड्रग बस्ट प्रकरण हाताळताना नियमांचं पालन केलं नाही. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांची नावे शेवटच्या क्षणी त्या एफआरआयमध्ये जोडण्यात आली होती. तर इतर काही संशयितांची नावे मूळ माहिती पत्रामधून वगळण्यात आल्याचंही उघड झालं आहे. (हे वाचा: दबंग IPS अधिकऱ्याने उघडपणे मागितली शाहरुख खानच्या मुलाची माफी, जाहीर पत्रातून उघड केली सर्व सत्ये ) एसईटीने ‘पंचनामा’ आणि इतर कागदपत्रांच्या विश्लेषणातून असंही निरीक्षण केलं आहे की, ‘पंचनामा’ सोबत जप्त करण्यात आलेल्या संशयितांचे फोन नव्हते किंवा वेगळा जप्ती मेमोही नव्हता. त्यामुळे फोन जप्त करण्यासाठी कोणतीही औपचारिक कागदपत्रे तयार करण्यात आलेली नव्हती. जप्ती मेमोच्या अनुपस्थितीत, जप्त केलेले फोन ताब्यात घेण्यात आले होते जो या प्रकरणातील एक महत्वाचा पुरावा होता. एसईटीने चौकशी केलेल्या अनेक साक्षीदारांनी सांगितलं की, त्यांच्या मौल्यवान वस्तू तसेच इतर संशयितांच्या वस्तू NCB मुंबईच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांशिवाय काढून घेतल्या होत्या. समीर वानखेडे यांना आणखी एक मुद्दा अडचणीत आणू शकतो, तो म्हणजे आरोपी अरबाज मर्चंटने सिद्धार्थ शाहला ‘चरस’ पुरवठादार असल्याचं उघड करुनही एनसीबीने त्याला मोकळे सोडले आहे. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या दोन्हींवरील त्याच्या फोन चॅटमध्ये तो ड्रग्ज सेवन करत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं होतं. तरीसुद्धा एनसीबीने शहा यांना क्लीन चिट दिल्याने आता संशय आणखीनच बळावला आहे. वानखेडे यांच्या परदेश दौऱ्यांवर तसेच त्यांच्या महागड्या घड्याळावरील खर्चावरही या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.2017 ते 2021 या सुमारे पाच वर्षांच्या कालावधीत, वानखेडे यांनी यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव यांसारख्या देशांना कुटुंबासह सहा खाजगी परदेशी भेटी दिल्या आहेत. केवळ 8.75 लाख रुपयांच्या घोषित रकमेसह 55 दिवसांच्या परदेशी मुक्कामाच्या सहलींचा कालावधी होता. जो फक्त विमान प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा आहे.

पुढे, अहवालात म्हटलं आहे की, वानखेडे आणि त्याचा मित्र विरल जमालुद्दीन हे जुलै 2021 मध्ये त्यांच्या कुटुंबियांसह ताज एक्झोटिका या मालदीव बीच सूटमध्ये राहिले होते. त्यावेळी त्यांनी बरीच रक्कम खर्च केली होती. एसईटीने चौकशी सुरु केली तेव्हा त्यांनी जमालुद्दीनच्या क्रेडिट कार्डद्वारे 18.12.2021 रोजी हॉटेलला 7.5 लाख इतकी रक्कम दिली होती. जमालुद्दीनकडून वानखेडेने 22,05,000 रुपये किमतीचे आलिशान रोलेक्स गोल्ड घड्याळ केवळ 17,40,000 रुपयांना खरेदी केल्याबद्दलही एसईटीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वानखेडे आपल्या परदेश दौऱ्यांवरील खर्च आणि महागड्या घड्याळांचे स्पष्टीकरण अद्याप देऊ शकले नाहीत. असं तपासात नमूद करण्यात आलं आहे. तपास पथकाने वानखेडे यांच्या मुंबई आणि वाशिम येथील मालमत्तेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर आणि त्यांच्या पत्नीच्या आयकर रिटर्न दस्तऐवजांचे विश्लेषण देखील केले आहे. पुढील तपशीलवार चौकशी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या