JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aryan Khan Case : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाकडून आजही जामीन नाहीच

Aryan Khan Case : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाकडून आजही जामीन नाहीच

आज आर्यन खानला जामीन मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर : आजही आर्यन खान (Aryan Khan Case) याच्या जामिनावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे आर्यन खानचा जामीन लांबल्याचं दिसून येत आहे. येत्या 20 ऑक्टोबर रोजी आर्यन खान याच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावण्यात येणार असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजही आर्यन खान याला दिलासा नसल्याचं चिन्ह आहे. NCB चे वकिल अनिल सिंह यांनी सांगितलं की, आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे पुढील 6 दिवस त्याला तुरुंगात राहावं लागणार आहे. हे ही वाचा- Aryan Khan case: आर्यन खान ड्रग्जचा नियमित ग्राहक असल्याचा दावा,‘जामीन मिळाला तर आर्यन खानच्या जामीन याचिवेर सुनावणीदरम्यान एनसीबीने कोर्टाला सांगितलं की, त्यांच्याजवळ असे पुरावे आहेत ज्यावरुन असं कळतं की, आर्यन बऱ्याच वर्षांपासून प्रतिबंधित ड्रग्सचं सेवन करीत होता. इतकच नाही तर त्याने दुसऱ्या देशांमध्ये जाऊनही नशा केला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकार शाहरूख आणि आर्यनच्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहे. मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला तो एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या