JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर, VIDEO ठरतोय चर्चेचा विषय

आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर, VIDEO ठरतोय चर्चेचा विषय

बॉलिवूडमधील स्टार किड्स नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक चर्चाही रंगतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे चर्चेचा विषय ठरत आहे.

जाहिरात

आर्यन खान,अनन्या पांडे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील स्टार किड्स नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक चर्चाही रंगतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये आर्यन खान अनन्या पांडेकला इगनोर करताना दिसत आहे. त्यामुळे दोघांविषयी भलतीच चर्चा रंगलीये. आर्यन माधुरी दीक्षितच्या ‘माजा मा’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये दिसला होता. यावेळी तो बहिण सुहाना खानसोबत आला होता. या कार्यक्रमातील आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन मस्त कूल अंदाजात कार्यक्रमात एन्ट्री घेतो आणि समोर उभ्या असलेल्या अनन्या पांडेला इग्नोर करुन निघून जातो. त्याच्या या वृत्तीचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

आर्यन खानच्या या व्हिडिओवर एक यूजर मजेशीर कमेंट करत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘आर्यनने दुर्लक्ष केले आहे.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे की, त्याने अनन्या पांडेकडे किती वाईट पद्धतीने दुर्लक्ष केले. अशाप्रकारे अनन्या पांडेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल चाहते भरपूर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. यामुळे तो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. हे प्रकरण महाराष्ट्रभर चांगलंच गाजलं. अनेक याप्रकरणी अनेक नावं समोर आली होती. अखेर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या