JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Aryan khan ने एनसीबीला दिले मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...'

Aryan khan ने एनसीबीला दिले मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...'

आर्यन खान (Aryan Khan) जेव्हा एनसीबीच्या(NCB) ताब्यात होता, तेव्हा त्याचे काऊन्सेलिंग करण्यात आले होते. त्याचदरम्यान आर्यनने एनसीबीला मोठे वचन दिले असल्याची माहिती समोर आला आहे.

जाहिरात

आर्यन खानने एनसीबीला दिले मोठे वचन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑक्टोबर : एनसीबीने (NCB)ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan)अटक करण्यात आली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली असून त्याचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आर्यन खानने एनसीबीला  मोठे वचन दिले असल्याची माहिती समोर आला आहे. तसेच त्याने माझ्यामुळे तुम्हाला गर्व वाटेल(Aryan Khan promised to make Sameer Wankhede proud of him)असेदेखील म्हटले आहे. आर्यन खान जेव्हा एनसीबीच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे काऊन्सेलिंग करण्यात आले होते. हे प्रत्येक ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत केले जाते. त्याचदरम्यान आर्यनने ‘यापुढे मी चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हाला माझ्यावर गर्व वाटेल’ असे मोठे विधान केले असल्याचे समोर आले आहे.

आर्यन काय म्हणाला?

तुरुंगातून बाहेर आल्यावर मी एक चांगला व्यक्ती बनेन. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत, गरीब लोकांना मदत करेन. तुम्हाला एक दिवस माझा गर्व वाटेल.असा शब्द आर्यनने काऊन्सेलिंग दरम्यान, एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडेंना दिला आहे. आर्यन व क्रूझवर अटक केलेल्या 7 जणांवर दोन एनजीओ आणि अधिकाऱ्यांकडून एनसीबीचे कार्यालय आणि आर्थर रोड तुरुंगात जाऊन समुपदेशन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आर्यनसह सातही जण 30 वर्षांच्या आतील आहेत. त्यांना ड्रग्जच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी ‘एनजीओ’तर्फे मदत करण्यात येत आहे. या तरुणांना समीर वानखेडे यांच्यासह अन्य अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून त्याचे दुष्परिणाम, देशाच्या हानीबद्दल माहिती देऊन त्यापासून परावृत्त केले जात आहे मुंबईच्या सत्र न्यायालयाने 14 ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामिनाच्या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. दसरा आणि विकेंडच्या सुट्या आदी आल्याने न्यायालय बंद राहणार आहे. यामुळे 20 ऑक्टोबरला त्याच्या जामिनावर निर्णय देण्यात येणार आहे. न्यायाधीशांनी मी व्यस्त आहे, निकाल देण्याचा प्रयत्न करेन असे म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या