अविन शाहूला (Avin Shahu) अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अटक केली होती. तर मनिष राजगरीया (Manish Rajagariya) याच्याकडून २.४ ग्रॅम गांजा जप्त केला होता.
मुंबई, 21 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khan Son NCB Case) आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. याप्रकरणी दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. दरम्यान आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (NCB Raid at Ananya Pandey’s Resident) हिच्या घरावर एनसीबीने गुरुवारी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, NCB ला क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडच्या या यंग जनरेशनमधील अभिनेत्रीचेही चॅट आढळून आले आहे. NCB च्या हाती लागलेल्या चॅटमध्ये तो या अभिनेत्रीसोबत ड्रग्जबाबत चर्चा करताना आढळले आहे. एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले आहे. असेही म्हटले जात आहे की अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला जाऊ दिले. दरम्यान आज बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये पोहोचला होता. यावेळचे शाहरुखचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील समोर आले होते. क्रूज ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. कोर्टाने त्याचा जमीन काल पुन्हा फेटाळून लावला आहे. शाहरुख जेलमध्ये पोहोचला तर NCB ‘मन्नत’वर दाखल दरम्यान एकीकडे शाहरुख मुलाला भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये दाखल झाला असताना, एनसीबीची टीम शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर पोहोचली आहे. एनसीबीची एक टीम अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत या निवासस्थानी दाखल झाली. मन्नत निवासस्थानी जवळपास अर्धा तास एनसीबीची टीम उपस्थित होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचा तपास सुरू आहे, साक्षीदार आणि संशयित दोघांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. मन्नतमध्ये कोणालाही चौकशीसाठी नोटीस देण्यात आलेली नाहीये. हा एक तपास प्रक्रियेचा भाग आहे.