JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमानच्या वाढदिवसाला अर्पिता खान देणार दुसऱ्या बाळाला जन्म? वाचा काय आहे सत्य

सलमानच्या वाढदिवसाला अर्पिता खान देणार दुसऱ्या बाळाला जन्म? वाचा काय आहे सत्य

काही दिवसांपूर्वीच अर्पिता खाननं ती दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट असल्याची घोषणा केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : बॉलिवूडचा दबंग सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांच्या लग्नाला नुकतीच 5 वर्ष पूर्ण झाली. काही दिवसांपूर्वीच अर्पितानं ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची घोषणा केली होती. आयफा अवॉर्ड सोहळ्याच अर्पिताचा पती आयुषनं सुद्धा लवकरच गोड बातमी मिळेल असं सांगितलं होतं. त्यानंतर आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अर्पिता खान सलमानच्या वाढदिवसालाच तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. एका न्यूज पोर्टलनं दिलेल्या वृत्तानुसार असं म्हटलं जातंय की अर्पिता आणि आयुषनं सलमान खआनच्या वाढदिवासाला म्हणजेच 27 डिसेंबरला सी-सेक्शन डिलिव्हरी करण्याचं ठरवलं आहे. याद्वारे अर्पिता स्वतःसाठी आणि भाऊ सलमानसाठी हा दिवस आणखी खास बनवू इच्छित आहे. त्यासाठी अर्पिता आणि आयुषनं मिळून हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. वेळेचं कोडं सोडवण्यात ‘ती’ होईल का यशस्वी? पाहा Vicky Velingkar चा थरारक Trailer

दरम्यान अर्पिता किंवा आयुषकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण जर ही बातमी खरी असेल तर मात्र खान आणि शर्मा कुटुंबीयांसाठीच नाही तर सलमानच्या चाहत्यांसाठी सुद्धा हा दिवस खास असणार आहे. सलमानचं भाचा अहिलवर असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. तो अनेकदा अहिलसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर अनु मलिक यांनी सोडला ‘इंडियन आयडॉल’ शो?

अर्पिता आणि आयुषनं 18 नोव्हेंबर 2014 मध्ये लग्न केलं होतं. या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. याशिवाय काही दिवसांपूर्वी अर्पितानं तिच्या वेडिंग अल्बम मधील काही फोटो सुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या दोघांनी अहिल हा 2 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. त्यानंतर आता अर्पिता पुन्हा एकदा प्रेग्नन्ट आहे. अनेक संकटांवर मात करुन हे सेलिब्रेटी आले एकत्र, फिल्मी आहे लव्हस्टोरी ===================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या