JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Arjun Kapoor च्या बहिणीला आवडतात त्याचे 'हे' 3 चित्रपट; अंशुलानं शेअर केली पोस्ट

Arjun Kapoor च्या बहिणीला आवडतात त्याचे 'हे' 3 चित्रपट; अंशुलानं शेअर केली पोस्ट

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) चर्चेत आलीये. अंशुलानं सोशल मीडियावर तिचा भाऊ अर्जुन कपूरच्या चित्रपटांविषयी एक गोष्ट शेअर केली आहे.

जाहिरात

anshula kapoor

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑगस्ट : बॉलिवूड कलाकार नेहमीच चर्चेत असलेले पहायला मिळतात. बॉलिवूड कलाकारांसोबत त्यांचे कुटुंबीयही अनेकवेळा चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) चर्चेत आलीये. अंशुलानं सोशल मीडियावर तिचा भाऊ अर्जुन कपूरच्या चित्रपटांविषयी एक गोष्ट शेअर केली आहे. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्याचं दिसत आहे. अंशुला कपूर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतंच अंशुलानं इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. यामध्ये एका चाहत्यांनं तिला अर्जुन कपूरचे कोणते चित्रपट आवडतात असा प्रश्न विचारला होता. यावर अंशुलानं अर्जुच्या चित्रपटांचं पोस्टर कोलाज करत आवडत्या तीन चित्रपटांची नावं सांगितली. यामध्ये अंशुलानं ‘संदीप और पिंकी फरार’, ‘इशकजादे’, ‘2 स्टेट’, या चित्रपटांची नावं घेतली. अंशुलाचं हे चाहत्यांसोबतचं चॅट सेशल चांगलंच व्हायरल झालं. हेही वाचा -  Independence Day : असे कलाकार ज्यांनी ‘या’ देशभक्तीपर भूमिका साकारून भारतीयांची मने जिंकली आहेत अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने अलीकडेच तिच्या वजन कमी करतानाचा एक फोटो शेअर केला होता. अंशुला कपूरने पूर्वीपेक्षा जास्त वजन कमी केल्याचे या फोटोत स्पष्टपणे दिसून आलं. अंशुलाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले. अंशुलानं बऱ्यापैकी वजन कमी केलं. अंशुला तिची फिटनेस दिनचर्या किंवा वर्कआउट सर्वांसोबत शेअर करत नाही पण तिचे बदल तिच्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतात.

दरम्यान, अंशुलाचा भाऊ अर्जुन कपूर कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल वक्तव्य करत असतो. अशातच अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान बॉयकॉटबद्दल सांगितलेलं पहायला मिळालं. चित्रपट ऐकल्यानंतर सर्व गोष्टी नीट मांडल्या आहेत की नाही ते पहा, विनाकारण हा विषय वाढवून नकारात्मक करणं योग्य नाही. शेकडो लोकांनी हा चित्रपट बनवला आहे, त्यामुळे चित्रपट पहा आणि संदर्भ पाहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या