अर्जुन कपूर इन्स्टा
मुंबई, 12 ऑक्टोबर- बॉलिवूड कलाकार सतत पार्टी आणि सेलिब्रेशनमध्ये व्यग्र असतात. असं म्हटलं जातं पार्टीसाठी कलाकरांना निमित्त हवं असतं. आणि आज निमित्त होतं अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या वाढदिवसाचं. अभिनेत्रीच्या सेलिब्रेटी मित्रांनी तिचा हा वाढदिवस फारच खास बनवला आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर,रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी आणि डिनो मोरिया सध्या लंडनमध्ये आहेत. नुकताच या सेलेब्रेटींनी विदेशात रकुलचा वाढदिवस साजरा केला. 10 ऑक्टोबरला अभिनेत्री रकुलचा वाढदिवस होता. अर्जुन आणि रकुलने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून या सेलिब्रेशनची एक झलक दाखवली आहे. अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग या दोघांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ‘राज’ फेम अभिनेता डिनो मोरिया आणि जान्हवी, ख़ुशी कपूरचा मित्र ओरहानही या फोटोंमध्ये दिसत आहे. रकुलचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता जॅकी भगनानीही यावेळी दिसून आला. खास म्हणजे अर्जुन कपूर यामध्ये मलायका अरोरासोबत उपस्थित होता. तर अभिनेत्री भूमी पेडणेकरदेखील फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. **(हे वाचा:** Singer Badshah: गायक बादशाह पडला ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; 1 वर्षापासून गुपचूप करतोय डेट )
अर्जुन कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असतो. कधी तो मलायकाबाबत लिहत असतो तर कधी आपल्या मित्र-मैत्रिणींबाबत. त्याची लेटेस्ट पोस्टसुद्धा चांगलीच व्हायरल होत आहे. अभिनेत्याने खास फोटो शेअर करत रकुलप्रीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने रकुलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत लिहलंय, “एका आनंदी दिवशी, काही प्रफुल्लित चेहरे. रकुलप्रीत सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला आशा आहे की तू हा दिवस आणि केकचादेखील आनंद घेतला असणार.
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रकुलप्रीत सिंगनेही अर्जुनच्या पोस्टवर कमेंट करत लिहलंय, “हा दिवस खास बनवल्याबद्दल धन्यवाद. काय दिवस होता.." रकुलने आपल्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो आणि एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मजेदार पद्धतीने केक कापताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उपस्थित सेलिब्रेटी चिअर्स करताना दिसून येत आहेत. रकुलने व्हिडीओ आणि फोटो शेअर करत लिहलंय, तोंडात पाणी आणणाऱ्या केकशिवाय वाढदिवस कसला’. हे फोटो सध्या चांगलेच पसंत केले जात आहेत.
रकुल प्रीत सिंगने साऊथ आणि बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने अनेक मोठमोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. अभिनेत्री सध्या अभिनेता–निर्माता जॅकी भगनानीला डेट करत आहे. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं रिलेशनशिप जाहीर केलं आहे.