JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोमात गेलेल्या अभिनेत्रीसाठी पुढे आला Arijit Singh, निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक

कोमात गेलेल्या अभिनेत्रीसाठी पुढे आला Arijit Singh, निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक

गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंगालची लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्माची प्रकृती चिंताजनक आहे.

जाहिरात

एंड्रिला शर्मा, अरिजित सिंह

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 नोव्हेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंगालची लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्माची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेत्रीला 15 नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतरच तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या. अशा परिस्थितीत अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. एंड्रिला कोमात असून मुलीला वाचवण्यासाठी कुटुंबाने आत्तापर्यंत पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. अशातच बॉलिवूड गायक अरिजित सिंग याने एंड्रिलाच्या कुटुंबाच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. अरिजितच्या या निर्णयावर चाहते आनंदी असून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. अरिजित सिंह अभिनेत्रीच्या कुटुंबाच्या संपर्कात असून शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष बाब म्हणजे एंड्रिलाकोमात असताना तिच्या कुटुंबीयांनी अरिजितला कोणतीही मदत मागितली नाही. तिचे वैद्यकीय बिल 12 लाखांच्या पुढे गेले आहे. अरिजित सिंह हा एंड्रिलाप्रमाणेच मुर्शिदाबादचा आहे. जेव्हा त्याला कळते की ती हॉस्पिटलमध्ये जीवन मृत्यूशी खूप संघर्ष करत आहे, तेव्हा त्याने एंड्रिलाला मदत करण्याचा निर्णय घेतला. आता या बातमीमुळे एंड्रिला शर्मा आणि अरिजित सिंहचे चाहते चांगलेच आनंदी आहेत.

संबंधित बातम्या

अभिनेत्री एंड्रिला शर्मा सध्या रुग्णालयात असून कोमात आहे. 1 नोव्हेंबर रोजी तिला ब्रेन स्ट्रोक आला. तिची प्रकृती अत्यंत वाईट आहे. त्याचबरोबर तिला अनेक हृदयविकाराचा झटकाही आला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव एंड्रिलाला याआधीही अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री प्रदीर्घ काळापासून तिच्या प्रकृतीशी झुंज देत आहे. मात्र आता हे प्रकरण गंभीर बनत चालले आहे. अभिनेत्रीचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, एंड्रिला शर्मा बंगाल इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. एंड्रिला शर्माने ‘झुमुर’ या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिनं तिच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  यानंतर तिने अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले. ‘जीवन ज्योती’, ‘जिओं काठी’मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या