शारदीय नवरात्रौत्सवाला( Navratri 2021)सुरुवात झाली आहे. याच उत्सवाचे औचित्यसाधत मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री 9 दिवस विविध देवींची रुप धारण करत हटके फोटोशुट करत असतात. दरम्यान, यामध्ये रात्रीत खेळ चाले शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar in goddess Mumba Devi attire) हीनेदेखील भाग घेतला आहे.
शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. याच उत्सवाचे औचित्यसाधत मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री 9 दिवस विविध देवींची रुप धारण करत हटके फोटोशुट करत असतात. दरम्यान, यामध्ये रात्रीत खेळ चाले शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीनेदेखील भाग घेतला आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणार आहे.
शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप धारण केले होते.
तर दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप धारण केले आहे. विशेष म्हणजे देवीच्या वेगवेगळ्या रुपातले फोटो शेअर करताना देवस्थानाचं महत्त्वही तिने शेअर केले आहे.
नवरात्रीचा दुसरा दिवस ! रंग - हिरवा ! देवी- मुंबादेवी, मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता 🙏🙏 मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले. मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली. असे देवीचे माहात्म्य सांगत अपूर्वाने प्रार्थना केली आहे.
मुंबादेवी, सर्व संकटात मुंबईचे रक्षण करते अशी भावना आहे.🙏🙏मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. असे म्हणत अपूर्वा नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप धारण केले होते. फोटोत अपूर्वाने मळवट भरला आहे. ती अंबाबाईप्रमाणे सोन्याने सजली आहे. डोईवर मुकुट आणि नाकात नथ असं अंबाबाईचं अभूतपूर्व रुप अपूर्वाने चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
अपूर्वाचा हा फोटो पाहून चाहत्यांच्या डोळ्याचं जणू पारणं फिटलं आहे. अपूर्वाच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.