मुंबई, 23 सप्टेंबर : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) अभिनेत्री पायल घोषने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर बहुतेक अभिनेत्रींनी अनुरागला पाठिंबा दिला आहे. मात्र कंगना रणौतने (Kangana Ranaut) पायलचं समर्थन केलं आहे. याआधीदेखील कंगनाने अनुराग कसा आहे, हे सांगितलं आणि आता त्याचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुरागने स्वत:च आपण शोषण केल्याची कबुली दिली आहे. कंगना रणौतने आपल्या ट्विटरवर एका ट्विटर युझरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुराग आपण एका मुलाचं शोषण केल्याचं सांगतो आहे. आपल्या शाळेत आपण केलेल्या एका कृत्याबाबत तो सांगतो आहे.
या व्हिडीओत अनुराग कश्यप सांगतो, जेव्हा तो शाळेत सिनीअर होता तेव्हा एका मुलाला तो एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि तिथं त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्याला मिठी मारली आणि त्यासमोर रडू लागला. मुलाला नेमकं समजलंच नाही की त्याच्यासोबत काय होतं आहे, म्हणून त्याने आपल्या पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर आपल्याला खूप लाज वाटली असंही अनुरागने सांगितलं. हे वाचा - “मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि…”, अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल हा व्हिडीओ राजीव सिंह राठोड या ट्विटर युझरने अपलोड केला आहे. जो कंगनाने रिट्वीट केला आहे. कंगना म्हणाली, मी याआधी सुसाइड गँगबाबत सांगितलं होतं, ज्यांनी सुशांतची हत्या केली आणि मलाही आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं. हे लोक असे का करतील असं मला अनेकांनी विचारलं. हे पाहा. कसं अनुराग कश्यप एका मुलाचं शोषण केल्याचं सांगतो आहे. हे ते लोक आहेत, जे दुःख देतात. दुसऱ्यांना दुःख देणं हेच उत्तर आहे, असं त्यांना वाटतं.