अनुपमा फेम नितेश पांडेसोबत निधनापूर्वी काय घडलं
मुंबई,24 मे- ‘अनुपमा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील अभिनेते नीतेश पांडे यांचं निधन झाल्याची बातमी नुकतंच समोर आली आहे. नितेश पांडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. ज्येष्ठ अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नीतेश पांडे यांनी अनुपमापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम करत आपली छाप पाडली आहे. आता अभिनेत्याच्या निधनाबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते नीतेश पांडे हे काल रात्री इगतपुरी नगरपरिषद हद्दीत असलेल्या हॉटेल ड्यू ड्रॉप येते मुक्कामास थांबले होते. त्या परिसरात ते कामानिमित्त थांबले होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या रुममध्ये हॉटेल स्टापने फोन केला असता अभिनेत्याने फोन उचलला नाही. अभिनेते काही कामात असतील म्हणून वेटरने पुन्हा 11:45 च्या सुमारास रूमच्या फोनवर फोन केला व त्यांच्या खाजगी मोबाईलवर फोन केला नितेश पांडे यांनी फोन व मोबाईल उचलला नाही. (हे वाचा: Anupamaa actor Nitesh Pandey: मोठी बातमी! ‘अनुपमा’ फेम नीतेश पांडेंचं निधन, मनोरंजन विश्वाला एका दिवसात दुसरा धक्का ) हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी सदर घटना हॉटेल मॅनेजरला सांगितली. हॉटेल मॅनेजर यांनी दुसऱ्या चावीने सदर रूमचा दरवाजा उघडला असता नितेश पांडे हे त्यांच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळले. तेथून त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आले. परंतु इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे सदर घटनेमुळे टीव्ही सिरीयल इंडस्ट्री मुंबई व फिल्म इंडस्ट्री मुंबई यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे नितेश पांडे यांचे वय अंदाजे 52 ते 53 वर्ष असावे इगतपुरी ते स्टोरी रायटिंग साठी नेहमी येत असतात काल रात्री त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली व हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले आहे पुढील तपास इगतपुरी चे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांचे कर्मचारी करीत आहे.
नीतेश पांडे आयुष्य- नितेश पांडे यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी झाला होता. अभिनयाची आवड असलेल्या नितेश यांनी 1990 मध्ये थिएटरपासून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी टीव्ही जगतात प्रवेश केला होता. ‘मंजिले अपनी अपनी’, ‘अस्तित्व एक प्रेम कहानी’, ‘साया’, ‘जुस्तजू’, ‘दुर्गा नंदिनी’ यांसारख्या शोमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. रुपाली गांगुलीच्या प्रसिद्ध शो ‘अनुपमा’मध्ये ते धीरज कपूरच्या भूमिकेत दिसत होते. नितेश यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 1998 मध्ये अभिनेत्री अश्विनी कालेस्करशी लग्न केलं होतं. मात्र 2002 मध्ये ते विभक्त झाले होते.