2मुंबई, 28 सप्टेंबर- अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक BTS व्हिडीओ**(BTS Video)** शेअर केला आहे. या व्हिडीओमधील सीन हा मानव-अर्चनाचा पहिला सीन असल्याचं अंकिताने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. नुकताच ‘पवित्र रिश्ता २’ (Pavitra Rishta 2) मधून मानव आणि अर्चना पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती अभिनेता शाहीर शेखसोबत पावसात भिजून एक सीन देताना दिसत आहे. हा सीन ‘पवित्र रिश्ता २’च्या सेटवरील आहे. अंकिताने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, हा सीन अंकिता-मानवचा पहिला सीन आहे. हा एक BTS व्हिडीओ आहे. चाहते या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात कमेंट्ससुद्धा देत आहेत. सुशांतचे चाहते मात्र अजूनही मानव म्हणून सुशांतच आपल्या डोळ्यात असल्याचं म्हणत आहेत. (**हे वाचा:** Dance Plus 6: ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्राने या सेलेब्रिटीला केलं प्रपोज ) ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून मानव आणि अर्चना अर्थातच सुशांत सिंह रजपूत आणि अंकिता लोखंडे घराघरात पोहोचले होते. या मालिकेने या दोन्ही कलाकरांना यशाच्या शिखरावर पोहोचवले होते. ही रील लाईफ जोडी रियल लाईफ जोडी बनली होती. मात्र दुर्दैवाने हे नातं काहीवर्षांनी संपलं होत. त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांत आणि अंकिताच्या चाहत्यांना आजही या दोघांचीच जोडी पसंत पडते. (**हे वाचा:** Bigg Boss: ‘ती क्युट बबली दिसते पण गुपचूप…’ मीराने केली स्नेहाची चुगली ) पहिल्या भागाच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आणि रसिकांच्या मागणीवरून ‘पवित्र रिश्ता’चा दुसरा भाग अर्थातच ‘पवित्र रिश्ता २’ सुरु करण्यात आला आहे. यामध्ये अर्चना म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडेच आहे तर सुशांतच्या जागी अभिनेता शाहीर शेख मानवच्या भूमिकेत झळकत आहे. मात्र चाहत्यांना अजूनही हे फारसं रुचलेलं दिसत नाहीय. चाहते आजही मानवाची जागा इतर कोणालाही द्यायला तयार नसल्याचं कमेंट्सवरून दिसून येत आहे. त्यामुळे या मालिकेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे.