JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाच्या दोन महिन्यानंतर अंकिता लोखंडे देणार Good News? खास पूजेचा Video Viral

लग्नाच्या दोन महिन्यानंतर अंकिता लोखंडे देणार Good News? खास पूजेचा Video Viral

अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) दोन महिन्यापूर्वी तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधली आहे. यानंतर लगेचच तिच्या गुडन्यूजची बातमी चर्चेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी - अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande)  दोन महिन्यापूर्वी तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधली आहे. एकदम धुमधडाक्यात अंकिताने विकीसोबत लग्न केले. लग्नानंतर अंकिता सोशल मीडियावर फोटो असेल किंवा व्हिडिओ असेल शेअर करत असते. यामुळे अंकिता सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. लग्नानंतर पहिल्यांदा अंकिता सासरी गेली आहे. विकी जैनच्या घरातल्यांनी एक पूजा ठेवली आहे. या पूजेत सहभागी होण्यासाठी अंकिता तिच्या सासरी गेली आहे. तिचा हा सासरचा व्हिडिओ एका वेगळ्या लोखंडेने (Ankita Lokhande Good News ) कारणामुळे देखील चर्चेत आला आहे. शिवाय अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी मात्र बुचकळ्यात पडले आहेत. अंकिता लवकरच गुडन्यूज तर देणार नाही ना असा प्रश्न नेटकऱ्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पडला आहे. नेटकरी कमेंट करत अंकिता प्रेग्नेंट (Ankita Lokhande Pregnancy) असल्याचा अंदाज बांधत आहेत. अंकिताच्या सासूबाई देखील तिच्याकडे लवकर गुडन्यूज देण्याची मागणी करत आहे. यावर अंकिताच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यालायक असेच आहेत. वाचा-  राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावावर केले 5 फ्लॅट्स; थक्क करणारी आहे किंमत व्हिडिओ शेअर करत अंकिता म्हटलं आहे की, बिलासपूरची ट्रिर नेहमी आठवणीत राहील यासाठी मम्मा आणि वहिनी खूप खूप धन्यवाद. अंकिताच्या या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करत विविध प्रतिक्रिय देत आहेत. या व्हिडिओत सर्वजण अंकिताला आशिर्वाद देताना दिसत आहेत. अंकिताच्या सासूबाई देखील तिच्याकडे गोड बातमी कधी देणार याची विचारणा करत आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये, अंकिताची सासू प्रथम येते आणि तिच्या ओटीमध्ये साडी आणि इतर वस्तू तिच्या घालते व तिला आशीर्वाद देतात. यावेळी त्या म्हणतात, ‘‘अंकिता दूधो नहाओ, पूतो फलो… लवकर गुडन्यूज दे’. अंकिताच्या सासूबाईंनी ही डिमांड करताच अंकिताही जोरात हसते आणि कॅमेराकडे बघत वेगळीच रिअॅक्शन देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या