JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / "हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे?", अंकिताने VIDEO शेअर करत खोडून काढला रियाचा दावा

"हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे?", अंकिताने VIDEO शेअर करत खोडून काढला रियाचा दावा

सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया होता आणि त्यासाठी तो औषध घ्यायचा असं रियाने एका मुलाखतीत सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) अनेक आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान रियाने नुकतीच एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तिने सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया होता आणि त्यासाठी तो औषधं घ्यायचा असा उल्लेख केला आहे. दरम्यान रियाचा हा दावा सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने खोडून काढला आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत रिया म्हणाली, “युरोपच्या प्रवासात सुशांतने मला आणि प्रत्येकाला सांगितलं की फ्लाइटमध्ये बसण्याची त्याला भीती वाटते कारण त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. त्यासाठी तो एक औषध घेतो. उड्डाण घेण्यापूर्वी त्याने स्वतः औषध घेतलं”. रियाची ही मुलाखत पाहताच अंकिताने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

विमान उडवणं हे सुशांतचं स्वप्न होतं, त्याला क्लॉस्ट्रोफोबिया कसा असेल, असा प्रश्न अंकिताने उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या

अंकिताने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे, “तुला नेहमीच उडायचं होतं आणि तू केलंसही. हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे का?” हे वाचा -  SSR Case: रिया चक्रवर्तीनं Instagram वर शेअर केला व्हिडीओ, म्हणाली… अंकिताच नाही तर सोशल मीडियावर सुशांतचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सुशांत विमान उडवण्याबाबत बोलतो आहे.

जाहिरात

सुशांतने या व्हिडीओ म्हटलं आहे, त्या विमान उडवायचं आहे. मात्र एका लायसेन्सची कमी आहे. हे लायन्सेस येतात तो विमान उडवणार. विमानाबाबत सुशांतचे हे व्हिडीओ पाहून रियाचा दावा अनेकांनी फेटाळला आहे. रिया सुशांतला विमानात भीती वाटायची सांगायची याला कोणताही आधार नाही, ती खोटं बोलते आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. हे वाचा -  पहिल्यांदाच रियानं दिली मुलाखत, युरोप ट्रीप ते हार्ड ड्राइव्हबाबत केला खुलासा दरम्यान या मुलाखतीत युरोप ट्रीपबाबत केलेल्या खर्चाबाबत विचारलं असता रियानं सांगितलं की, “मी पॅरिसमध्ये एका कंपनीबरोबर शूट केलं होतं. कपड्यांच्या कंपनीचा एक फॅशन शो होता. यासाठी कंपनीकडून माझं बिझिनेस क्लासचं तिकीट आणि हॉटेल याचं बुकिंग झालं होतं. त्यानंतर सुशांतने युरोप ट्रीप करण्याचा विचार केला. त्यानं माझं तिकीट रद्द करून स्वत: खर्च केला” रियानं यावेळी सुशांतला किंग लाइफ जगायला आवडत असल्याचंही सांगितलं. याआधी सुशांत आपल्या मित्रांसोबत थायलंडला गेला होता, त्यावेळी त्यानं 70 लाख खर्च केले होते असं तिनं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या