मुंबई, 19 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका आहे. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मालिकेला प्रेम दिलं आहे. आजवर मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आले. कथानक बदललं. पण ज्या प्रेक्षकांनी मालिकेला डोक्यावर घेतलं त्याच प्रेक्षकांनी मालिकेला चांगलंच ट्रोल देखील केलं आहे. मालिकेत सगळीच पात्र एकाहून एक आहेत. अरुंधतीपासून आजी, आप्पा, संजना, अनिरुद्ध ते आता मालिकेत आलेल्या अनिश पर्यंत सगळीच पात्र प्रेक्षकांना आपली वाटतात. महाराष्ट्राच्या घराघरात आई कुठे काय करते ही मालिका आवर्जुन पाहिली जाते. सध्या मालिकेत सुरू असलेल्या ट्र्रॅकवरून प्रेक्षकांनी अनिरुद्धला चांगलंच ट्रोल केलं आहे. आई कुठे काय करते मालिकेत सध्या आपण पाहिलं तर अरुंधतीनं देशमुखांचं घर सोडल्यापासून अनिरुद्धनं मात्र त्याची नवी खेळी सुरू केली आहे. अरुंधतीविषयी अभिच्या मनात शंका उपस्थित करुन अभि आणि अरुंधतीच्या नात्यात दुरावा आणला आहे. आशुतोष आणि अरुंधतीची मैत्री अभिला सहन होत नाही. त्यामुळे तो सतत अनघा आणि घरातील सगळ्यांवर चिडचिड करत असतो. हेही वाचा - Tu chal pudha : ‘नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेम नाही आदर हवा’; अश्विनीच्या उत्तराने जिंकलं महिला प्रेक्षकांचं मन तर दुसरीकडे अनिरुद्ध त्याची खेळी उत्तमरित्या खेळत असून सतत अरुंधतीविषयी वाईट बोलून तिची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या अनिरूद्ध काहीही बोलताना दिसत आहे. त्याचं म्हणणं अनेकदा खटकताना दिसत आहे. मात्र हिच अनिरूद्ध या पात्राची खरी मजा आहे असं म्हणायला हरकत नाही.
सध्या मालिकेचा एक प्रोमो रिलीज झाला ज्यात अनिश आणि इशा यांनी एकाच कॉलेजमध्ये अँडमिशन घेतलं आहे. ही गोष्ट मात्र अनिरूद्धला चांगलीच खटकली आहे. त्यामुळे तो अनिश ज्या ठिकाणी जाईल तिथे इशा जाणार नाही. अनिशची अँडमिशन कॅन्सल करा असं आशुतोषला सांगतो. त्यावर आशुतोष त्याला सडेतोड उत्तर देत हवं तर तुमच्या मुलीचं अँडमिशन काढून टाका मी अनिशचं अँडमिशन कॅन्सल करणार नाही.
आताच नाही तर अनिरुद्ध गेली अनेक दिवस अशीच वायफळ आणि कोणाच्याही डोक्यात जाईल अशी बडबड करताना दिसत आहे. त्याचा हे वागणं बघून नेटकऱ्यांनी ‘अनिरुद्ध वेडा झाला आहे’, असं म्हणतं ट्रोल केलं आहे. मालिकेतील सध्याचा ट्रॅक पाहून एका युझरनं म्हटलंय, ‘इथे आई सोडून बाकी सगळ्या विषयांवर भाष्य चालू आहे’. तर काहींनी बदललेल्या संजनाचंही कौतुक केलं आहे. ‘तू आता मला हळू हळू आम्हाला आवडायला लागली आहेस’, असंही अनेकांनी म्हटलं आहे.