JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 3 लग्न करूनही ही अभिनेत्री राहतेय एकटी, जाणून घ्या तिच्या आयुष्यातील कधीही न वाचलेल्या गोष्टी

3 लग्न करूनही ही अभिनेत्री राहतेय एकटी, जाणून घ्या तिच्या आयुष्यातील कधीही न वाचलेल्या गोष्टी

‘लुकिंग टू गेट आउट’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून पहिल्यांदा काम केलं. या सिनेमापासून चेहऱ्याला लागलेला रंग आजता गायत कायम आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली- हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली ही जगातील सुंदर महिलांपैकी एक आहे. अँजेलिनाने ‘लुकिंग टू गेट आउट’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून पहिल्यांदा काम केलं. या सिनेमापासून चेहऱ्याला लागलेला रंग आजता गायत कायम आहे. अँजेलिनाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ती एक वर्षांची असतानाच तिच्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला होता. यानंतर तिचं संगोपन आई आणि भावाने केलं. एका मुलाखतीत अँजेलिना म्हणाली होती की, सुरुवातीला अभिनयात अजिबात स्वारस्य नव्हतं. पण, मोठी होत असताना ती आईसोबत सिनेमा पाहायला जाऊ लागली आणि तिला सिनेमाचं विश्व आवडू लागलं.

अँजेलिनाने आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे. अँजेलिनाने जॉनी ली मिलर याच्याशी 28 मार्च 1996 मध्ये पहिलं लग्न केलं. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या हॅकर सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघांचं अफेअर सुरू झालं होतं. असं म्हटलं जातं की, ती जॉनीच्या एवढ्या प्रेमात होती की तिने रक्ताने मिलरचं नाव लिहिलं होतं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 3 फेब्रुवारी 1999 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अँजेलिनाचं दुसरं लग्न अभिनेता बॉब थार्नटन याच्याशी झालं. पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. 2003 मध्ये तिने घटस्फोट घेतला. यानंतर 2005 मध्ये अँजेलिना आणि ब्रॅड पिटच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघांच्या अफेअरच्या चर्चांमुळे ब्रॅड पिट आणि जेनिफर अॅनिस्टनचं लग्न मोडलं. नंतर अनेकवर्ष अँजेलिना आणि ब्रॅड हे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची सहा मुलंही आहेत. अनेक वर्ष लिव्ह- इनमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केलं. हॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जायचं. पण आधीच्या दोन लग्नासारखंच हे लग्नही टिकलं नाही. अखेर दोघं वेगळी झाली आणि सध्या अँजेलिना आपल्या मुलांसोबत राहत आहे. महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या