JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ananya Pandey चा नवा प्रमोशन फंडा, तेलुगू भाषेत दाखवला भलताच स्वॅग

Ananya Pandey चा नवा प्रमोशन फंडा, तेलुगू भाषेत दाखवला भलताच स्वॅग

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडानं लाइगरच्या प्रमोशनसाठी मुंबईनंतर आता तेलंगणातील वारंगल शहरामध्ये हजेरी लावली. यावेळी अनन्याचा अनोखा अंदाज पहायला मिळाला.

जाहिरात

Ananya Pandey and vijay deverkonda

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑगस्ट: बॉलिवूडची ‘चुलबूल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री अनन्या पांडे आणि लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांचा आगामी चित्रपट ‘लाइगर’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहेत. मुंबई आणि हैदराबादमध्ये ट्रेलर लॉन्च केल्यानंतर, अनन्या आणि विजय लाइगरच्या प्रमोशनसाठी भारतातील मल्टीसिटी टूरवर आहेत. प्रमोशनचा नवनवीन फंडा वापरत दोघेही चित्रपटाचं जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहे. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडानं लाइगरच्या प्रमोशनसाठी मुंबईनंतर आता तेलंगणातील वारंगल शहरामध्ये हजेरी लावली. यावेळी अनन्याचा अनोखा अंदाज पहायला मिळाला. तेलुगू चाहत्यांसाठी अनन्या तेलगुमध्ये बोलताना दिसली. अनन्यानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत अनन्या म्हणाली की, ‘वारंगलमधील केलेल्या तेलुगू भाषणातून मी माझं सर्व प्रेम तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दिलेलं सगळं प्रेम तुम्हाला परत देण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे की मी दिलेलं प्रेम तुम्हाला फील झालं असेल’.

संबंधित बातम्या

पुरी जगन्नाथ, चर्मे कौर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी मिळून हा चित्रपट बनवला आहे. 25 ऑगस्ट 2022 रोजी संपूर्ण भारतात हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल. लाइगर’ स्पोर्ट्स अॅक्शन ड्रामामध्ये अनन्या पांडे विजय देवरकोंडा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. फ्रेश जोडी आपल्याला 25 ऑगस्टला सिनेमागृहात पहायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते खूप उत्साही आणि आनंदी आहेत. हेही वाचा -  Supriya Pilgaonkar B’day: सुप्रिया पिळगावकरांचा वाढदिवस लेकीने बनवला खास; शेअर केले Unseen Photo दरम्यान, दरम्यान, विजय देवरकोंडानं अर्जुन रेड्डी’ या चित्रपटातून चाहत्यांना वेड लावलं होतं. विजय आता हिंदी प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्यामुळे आगामी चित्रपटांतून विजय काय जादू पसरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या