मुंबई, 22 सप्टेंबर : फिल्ममेकर करण जोहरचा बहुचर्चित शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. या टॉक शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. सध्या कॉफी विथ करणचा 7 वा सीझन सुरु असून नुकतंच या शोमध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खान यासोबत संजीव कपूरची पत्नी महीप कपूर आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडे यांनी हजेरी लावली. या भागात भरपूर मस्ती आणि खुलासे झाले. कॉफी विथ करणमध्ये भावना पांडेनंही अनन्या पांडेविषयी खुलासा केला. अनन्या पांडेनी एका वेळी दोन जणांना डेट करत असल्याचा खुलासा यावेळी भावना पांडेनी केला. करणने रॅपिड फायर राऊंडमध्ये गौरी खानला मुलीला काय डेटिंग टीप्स देशील विचारलं. यावेळी गौरी म्हणाली की, एका वेळी दोन जणांना डेट करु नकोस. यावर करण म्हणतो की अनन्याने हे पहिलेच केलं आहे. यावर भावना म्हणते की, तिनं हे केलंय का?. भावनाला हे ऐकूण धक्काच बसला. त्यानंतर तिने अनन्याची बाजू घेत म्हटलं की, ती दोनचा विचार करत होती त्यामुळे तिने एकाशी ब्रेकअप केला.
डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. कॉफी विथ करणचा सातवा सीझन सुरु झाल्यापासून शोविषयी सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरत आहे. सेलिब्रेटींविषयी अनेक किस्से, खुलासे, धमाल, मस्ती पहायला मिळत आहे. याशिवाय अनेक गुपितं देखील उघड झालेली पहायला मिळतायेत.
दरम्यान, गौरी खान, भावना पांडे, महीप कपूर यांच्या एपिसोडची खूप झालेली पहायला मिळाली. अद्यापही अनेक बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. आतापर्यंत या भागात अनेक कलाकारांनी हजेरी लावली.