JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Amruta Khanvilkar : 'हॉटेलच्या रूममध्ये एकटी असली की सगळे....'; बस बाई बसमध्ये अमृतानं केला खुलासा

Amruta Khanvilkar : 'हॉटेलच्या रूममध्ये एकटी असली की सगळे....'; बस बाई बसमध्ये अमृतानं केला खुलासा

खासदार सुप्रिया सुळेंच्या रंगतदार कार्यक्रमानंतर झी मराठीवरील बस बाई बसमध्ये आजच्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर हजेरी लावणार आहे. अमृताला विचारलेल्या भन्नाट प्रश्नांनी आजचा चांगलाच रंगणार आहे.

0111

झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या बस बाई बस या कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर हजेरी लावणार आहे.

जाहिरात
0211

अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमात सुत्रसंचालकाच्या भुमिकेत आहे.

जाहिरात
0311

खासदार सुप्रिया सुळेंबरोबरचा पहिला धम्माल एपिसोड रंगल्यानंतर आता सुबोध अमृताबरोबर मनोरंजनाची बस घेऊन सुसाट मनोरंजन करणार आहे.

जाहिरात
0411

अभिनेत्री उर्मिला नेहमी प्रमाणेच तिच्या डान्सनं प्रेक्षकांना घायाळ करताना दिसणार आहे. बसमधील महिलांबरोबर अमृता चंद्रमुखी गाण्यावर थिरकताना पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
0511

मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून महिलांच्या प्रश्नांची उत्तर देताना अमृताची पुरती दमछाक उडणार आहे.

जाहिरात
0611

अमृताच्या अनेक चांगल्या वाईट सवयींचा भांडा फोड आजच्या भागात होणार आहे.

जाहिरात
0711

कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये महिला तिला 'तुला भाकरी करता येते का चपाती?', 'घाबरट आहे का बिनधास्त?', असे बेधडक प्रश्न विचारता दिसत आहेत.

जाहिरात
0811

महिलांच्या या दमदार प्रश्नांची अमृता काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी प्रेक्षाकांची उत्सुकता वाढली आहे.

जाहिरात
0911

हॉटेलच्या रुममध्ये एकटी असले की मी सगळे लाईट्स चालू करुन ठेवते, असा एक खुलासा अमृतानं केला आहे. त्याचा प्रोमो पाहायला मिळत आहे.

जाहिरात
1011

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमृताचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे आजच्या भागात प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

जाहिरात
1111

बस बाई बसच्या आजच्या भागात काय रंगत येणार हे रात्री 9:30 वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या