JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

चार दशकांहूनही अधिकच्या कारकीर्दीत त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांत काम केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 सप्टेंबर- बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वतः ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली. अँग्री यंग मॅन अशी ओळख असलेल्या अमिताभ यांनी 1970 च्या दशकापासून सिनेसृष्टीचे रुप पालटले. चार दशकांहूनही अधिकच्या कारकीर्दीत त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांत काम केले. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. यात चार राष्ट्रीय पुरस्कार आणि 14 फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, निर्माते आणि टीव्हीवरही त्यांनी आपली उल्लेखनिय छाप सोडली.

काय आहे दादासाहेब फाळके पुरस्कार- दादासाहेब फाळके पुरस्कार हे भारत सरकारकडून दिला जातो. हा एक वार्षिक पुरस्कार असून भारतीय सिनेमांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. सिनेसृष्टीतील त्याच्या योगदानाला सरकारने दिलेली ही कौतुकाची थाप असते. सर्वातआधी हा पुरस्कार अभिनेत्री देविका रानी यांना देण्यात आला होता.

VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली ‘ही’ घोषणा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या