अमिताभ यांची नात नव्या नंदाचा नवा व्हिडिओ व्हायरल
मुंबई, 21 जून : बॉलीवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत जे आपल्या शुद्ध हिंदीने प्रभावित करतात. त्यात अमिताभ बच्चन, आशुतोष राणा, मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. अमिताभ यांच्या घरातही हिंदीचा प्रभाव आहे आणि कारण त्यांच्या घऱाचा पहिल्यापासून साहित्याशी संबंध आहे. आता अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका यूथ टॉक कार्यक्रमातील नव्याचा हा व्हिडिओ आहे. सध्या नव्याला शुद्ध हिंदी बोलताना पाहून लोकांना देखील आश्चर्य वाटत आहे. लोक नव्याच्या हिंदीचे कौतुक करत आहेत आणि तिचा व्हिडिओ शेअर करत आहेत. नव्या देखील तिच्या आजी जया बच्चन यांच्याप्रमाणेच अगदी शुद्ध आणि स्पष्ट हिंदी बोलताना दिसतेय. नुकताच नव्याने एका टॉक शोमध्ये भाग घेतला. यावेळी तिनं बदल घडवून आणण्यासाठी तरुणांची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर आपले विचार मांडले. नव्याने तिचा मुद्दा हिंदीत सर्वांसमोर मांजला आणि विशेष म्हणजे तिची हिंदी खूपच शुद्ध आहे. नव्यानं तिच्या हिंदी बोलण्याच्या कौशल्याने लोकांचे मने जिंकले असून शिवाय शुद्ध हिंदीत प्रभावीपणे बोलणाऱ्या तिच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे तिने सांगितले.
या टॉक शो दरम्यान नव्या म्हणाली की, ‘मी अनेकवेळा ऐकते की, तुला अनुभव नाही, तू तरुण आहेस. तुम्ही 25 वर्षांचे आहात, तुमचा जीवनाचा अनुभव काय आहे? आरोग्यसेवा, कायदेशीर जागरूकता, घरगुती हिंसाचार या विषयांवर तुम्ही कसे काम करू शकता? मी विचार करते की, 80 वर्षे वाट पाहिली तर जगाचे काय होईल? आपल्या देशातील अनेक टक्के लोक 20 ते 30 वयोगटातील आहेत. सर्व काही करण्यासाठी 50 वर्षे वाट पाहिली तर या पिढीचे काय होईल? आपल्या देशात बदल कोण आणणार? या पिढीला लहान वयात भरपूर ज्ञान आहे, आपणाला कमी लेखू नये, आपण सक्षम आहोत, असं नव्या म्हणताना दिसत आहे.
नव्याचे विचार सर्वांनाच भावले आहेत. यासोबतच तिची हिंदी बोलण्याची शैलीही लोकांना आवडली होती. लोक म्हणाले, ‘आम्हाला असे तरुण हवे आहेत.’, एकाने म्हटले आहे की, ‘किमान तिला उत्तम हिंदी येते.’ एका यूजरने म्हटले आहे की, ‘बिग बींच्या नातीच्या हिंदीने तिचे मन जिंकले आहे.’