JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शीश झुकाके नत मस्तक हूँ मैं! Corona शी लढणारे अमिताभ बच्चन झाले भावुक

शीश झुकाके नत मस्तक हूँ मैं! Corona शी लढणारे अमिताभ बच्चन झाले भावुक

Covid शी लढण्याच्या शुभेच्छांमुळे भारावून गेलेल्या अमिताभ बच्चन यांनी (Amitabh Bachchan) यांनी अत्यंत भावुक कविता शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा मित्रपरिवार, नातेवाइक, इतर कलाकार आणि चाहत्यांनी बच्चन कुटुंबं लवकरात लवकर बरं व्हावं, यासाठी प्रार्थना केली. अमिताभ यांच्यासाठी इतक्या लोकांनी प्रार्थना केली की ते पाहून अमिताभ भावुक झालेत. अमिताभ यांनी कवितेच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानलेत. मी तुमच्यासमोर हात जोडून आणि नतमस्तक होऊन तुमचे आभार मानतो असं अमिताभ म्हणालेत.

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली. अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे सर्व जण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. त्यावर अमिताभ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे वाचा -  ‘ती चूक नव्हती’; बच्चन कुटुंबासाठी केलेल्या Tweet वर जुही चावलाचं स्पष्टीकरण शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या