JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Uunchai Trailer: इमोशन आणि इन्स्पिरेशनने भरलेली 3 मित्रांची गोष्ट, ट्रेलर आला समोर

Uunchai Trailer: इमोशन आणि इन्स्पिरेशनने भरलेली 3 मित्रांची गोष्ट, ट्रेलर आला समोर

सध्या एकापेक्षा एक बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यामुळे मनोरंजनामध्ये यंदा काही तोटा नाही. नुकताच आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

जाहिरात

Uunchai Trailer

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑक्टोबर : सध्या एकापेक्षा एक बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यामुळे मनोरंजनामध्ये यंदा काही तोटा नाही. नुकताच आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘उचांई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये बोमन इराणी आणि नीना गुप्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मैत्रीवर आधारित ‘उचांई’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यापासून सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘मैत्री ही प्रेरणा’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित दिग्दर्शनाची झलक ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येते. चित्रपटाची मूळ कथा मैत्रीवर आधारित असून त्यात भावना, प्रेम आणि प्रेरणा पहायला मिळत आहे. हेही वाचा - Karan Johar: ‘कष्ट करणारे रस्त्यावर आणि….’; करण जोहरची मार्मिक पोस्ट होतेय व्हायरल एका गाण्यात आपला वाढदिवस साजरा करताना अभिनेता डॅनी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे आणि हा त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. पण नंतर डॅनीच्या मृत्यूने सर्वकाही बदलले. डॅनीला माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर जायचे होते! डॅनीला त्याच्या बालपणीच्या मित्रांसोबत पुन्हा आयुष्य जगायचं होतं! त्याचे मित्र ही इच्छा कशी पूर्ण करतात, ही ‘उचांई’ची चित्रपटाची कथा असणार आहे. https://youtu.be/rerwio14Fes दरम्यान, डॅनीच्या मृत्यूनंतर, त्याचे तीन मित्र- अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी त्याच्या आठवणीत ट्रेकिंगला जातात. वयाच्या 65 व्या वर्षी हा ट्रेक करणं किती कठिण असणार आहे हे या चित्रपटातून पहायला मिळेल. परिनिती या ट्रेकची मार्गदर्शक असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या