याशिवाय साराच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या वेगवेगळ्या व्हेकेशनचे वेगवेगळे फोटो पाहायला मिळतात.
मुंबई, 14 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर NCB ने कारवाई केली असून सध्या ती तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वी रियाने ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे घेतल्याची माहिती समोर आली होती. रियाने बॉलिवूडमधील अनेक पार्टयांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचा खुलासा केल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता NCB ने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री सारा अली खान, सिमॉन खंबाटा आणि रकुलप्रीत सिंह यांचं नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आलं आहे. मात्र त्यांना समन्स देण्यात आलेलं नाही, एनसीबीने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने सारा अली खान हिचं नाव ड्रग्ज प्रकरणात घेतलं होतं. सारा अली खान एका हाय प्रोफाइल ड्रग्ज पॅडलरच्या संपर्कात होती, ज्याची एनसीबी तपास करीत आहे. एनसीबीची विशेष तपास दलाकडून सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास करीत आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, शौविक, सुशांतचा प्रबंधक सॅम्युअल मिरांडा, घरातील सहाय्यक दिपेश सावंत आणि अन्य काही जणांना अटक केलं आहे. ही सर्वजण न्यायिक अटकेत आहेत. NCB ला कशी मिळाली ड्रग्ज प्रकरणाची माहिती जेव्हा एनसीबी रिया, तिचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेशच्या बँक खात्याची छाननी करत होते, तेव्हाच त्यांना रियाच्या कार्डवरून झालेला एक आर्थिक व्यवहार सापडला होता. रियाच्या कार्डवरून एका ड्रग डिलराला बड म्हणजे गांज्याचे पैसे देण्यात आले होते. शोविक काही महिन्यांपूर्वीच सॅम्युअल मिरांडाला एका ड्रग्ज डिलरकडे बड आणण्यासाठी पाठवलं होतं. मात्र घाईघाईत सॅम्युअल पैसे घेऊन जायला विसरला. तिथं पोहोचल्यावर सॅम्युअलने शोविकला फोन केला आणि पेमेंट द्यायला सांगितलं. तेव्हा शोविकने सॅम्युअलला रियाच्या कार्डने पेमेंट करायला सांगितलं. एका ड्रग डिलरसह रियाचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दिसल्यानेच रियावरील एनसीबीने आपल्या चौकशीचा फास अधिक आवळला.