अल्लू अर्जुन
मुंबई, 18 ऑक्टोबर- साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक नवे रेकॉर्ड स्थापित केले आहेत. या चित्रपटाने लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच वेड लावलं आहे. या चित्रपटाचे डायलॉग्स आणि गाणी सतत लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची जोडी सुपरहिट ठरली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून आहे. पुष्पा- द राईजच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी आता ‘पुष्पा- द रुल’ ची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं समजताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच आता दुसऱ्या भागात काय रंजक असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. चाहत्यांना लवकरच पुष्पा २ पाहायला मिळणार याची आता खात्री पटली आहे. **(हे वाचा:** अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी Good News! ‘या’दिवशी ‘पुष्पा 2’ च्या शूटिंगला होणार सुरुवात ) पुष्पामध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकलेली रश्मिका मंदाना चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठीदेखील तितकीच उत्सुक आहे. नुकतंच निर्मात्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पुष्पाचा आगामी भाग ‘पुष्पा द रुल’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तांत्रिक मंडळी जोरदार काम करत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये एखाद्या सीनबाबत बोललं जात असल्याचं दिसून येत आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाने फक्त देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. त्याने या भूमिकेसाठी अफाट मेहनत घेतली होती. त्याला पहिल्यांदा या रुपात पाहून चाहते थक्क झाले होते. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या कामाचंदेखील विशेष कौतुक झालं होतं. या दोघांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला जमवत अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले होते.
या चित्रपटातली पुष्पा नाम सून कर फ्लॉवर समझी क्या… ‘झुकूंगा नाही’… असे अनेक डायलॉग तुफान लोकप्रिय झाले आहेत. तसेच शश्रीविल्ली हे गाणंदेखील तितकंच प्रसिद्ध झालं होतं. या चित्रपटात एक आयटम सॉन्गदेखील दाखवण्यात आला होता. यामध्ये साऊथ सुंदरी समंथा प्रभू झळकली होती.हा ‘ओ अंटावा’ हा आयटम सॉन्ग लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. दुसऱ्या भागात समंथा दिसणार की नाही याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहे.