JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Richa Chadha Ali Fazal Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची लग्नपत्रिका आहे फारच भन्नाट; तुम्ही एकदा पाहाच!

Richa Chadha Ali Fazal Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची लग्नपत्रिका आहे फारच भन्नाट; तुम्ही एकदा पाहाच!

रिचा आणि अलीचा शाही विवाहसोहळा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. पण सध्या चर्चा होतेय ती या दोघांच्या लग्नपत्रिकेची. अशी पत्रिका तुम्ही क्वचितच पहिली असेल.

जाहिरात

Richa chaddha and ali fazal

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21  सप्टेंबर : रिचा चढ्ढा आणि अली फजल  हे बॉलिवूडमधील लोकप्रिय  जोडप्यांपैकी एक आहेत. ते अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला वेग आला आहे. हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रिचा आणि अलीचा शाही विवाहसोहळा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. रिचा आणि अलीचा पाच दिवस विवाहसोहळा पार पडणार आहे. पण सध्या चर्चा होतेय ती या दोघांच्या लग्नपत्रिकेची. अशी पत्रिका तुम्ही क्वचितच पहिली असेल. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे कार्ड पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने डिझाइन केले आहे, जे खूप सुंदर दिसत आहे.  रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या कार्डचे फोटो समोर आले आहेत. हे कार्ड पाहून तुम्हाला जुन्या काळाची आठवण होईल, कारण ते रेट्रो फील देत आहे. ही लग्नपत्रिका अतिशय सुंदर आणि अनोखी शैलीची आहे. या जोडप्याला मित्राने डिझाइन केलेले कार्ड मिळाले आहे. हे कार्ड मॅचबॉक्सच्या आकारात बनवण्यात आले असून त्यावर रिचा आणि अलीच्या चेहऱ्याचे रेखाटन करण्यात आले आहे. हे पूर्णपणे 90 च्या दशकाचा रेट्रो फील देत आहे, त्यावर लिहिले आहे, कपल मॅचेस. फोटोमध्ये रिचा आणि अली पारंपरिक कपड्यांमध्ये सायकल चालवताना दिसत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल पुढच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. त्याचबरोबर या महिन्यात दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. लग्न 6 ऑक्टोबरला होणार आहे, तर रिसेप्शन 7 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. याशिवाय 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत प्री-वेडिंग फंक्शन्स होणार आहेत. त्याच वेळी, बिकानेरचे 175 वर्षीय रोखपाल ज्वेलर्स कुटुंब ऋचाच्या दिल्लीतील फंक्शनसाठी तिचे दागिने तयार करत आहे. हेही वाचा -  Raju Srivastava Death: राजू श्रीवास्तव यांचं शेवटचं स्वप्न अपूर्णच; करायचं होतं ‘हे’ काम दिल्लीत रिचा आणि अलीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत एका ग्रॅंड रिसेप्‍शनचं आयोजन केलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत नियोजित अंतिम भव्य सोहळ्यासह लग्नाचा उत्सव दिल्लीत सुरू होईल. लग्नाच्या विधींव्यतिरिक्त, जोडप्याने कुटुंब आणि मित्रांना संगीत आणि मेहंदी समारंभ आयोजित करण्याची योजना आखली आहे. हे रिसेप्शन दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये ३५०-४०० पाहुण्यांसह होणार आहे, ज्यात बॉलिवूडमधील त्यांचे कलाकार मित्र सहभागी होतील.

हे जोडपे त्यांच्या फुक्रे  चित्रपटाच्या सेटवर 2013 मध्ये  भेटले होते. अनेक वर्ष डेट करून  डिसेंबर 2019 मध्ये अलीने मालदीवमध्ये सुट्टीवर असताना रिचाला तिच्या वाढदिवशी प्रपोज केले होते.आता हे दोघे लग्न करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या