JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमार करतोय जाहिरातीचं शूटिंग, सेटवरील Photo Viral

लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमार करतोय जाहिरातीचं शूटिंग, सेटवरील Photo Viral

अक्षय कुमार शूट करत असलेली जाहीरात ही केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी तयार केली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हैराण झालं आहे. या व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललेलं दिसत आहे. त्यामुळे देशात सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळे सध्या बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्व शूटिंग बंद पडली आहे. पण अशात अभिनेता अक्षय कुमार लॉकडाऊनमध्ये एका जाहिरातीचं शूट करत असल्याची माहिती समोर आली आहे. या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेता अक्षय कुमार जाहिरातीचं शूट करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी अक्षय कुमारनं पुन्हा एकदा कामाला सुरूवात केल्याचं म्हटलं आहे. अर्थात हे सर्व योग्य ती परवानगी घेऊनच करण्यात येत आहे. याशिवाय सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. धक्कादायक! 22 वर्षीय अभिनेत्रीचं निधन, राहत्या घरातच सापडला मृतदेह

फिल्मफेअर या सेटवरील एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. ज्यात सॅनिटायझर, मास्क, फेस शील्ड इत्यादी गोष्टी पुरवल्या जात असल्याचं दिसत आहे. तसेच हे संपूर्ण शूटिंग सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून केलं जात असल्याचं दिसत आहे. फिल्मफेअरनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अक्षय कुमारसोबतचं त्याच्या ‘पॅड मॅन’ सिनेमाचे दिग्दर्शक आर बाल्की सुद्धा दिसत आहेत. तेच या जाहिरातीचं दिग्दर्शन करत आहेत. अक्षय कुमार शूट करत असलेली जाहीरात ही केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी तयार केली जात आहे. शाहरुख खानचा बॉडी डबल दिवसाला करतो एवढी कमाई, रक्कम ऐकून व्हाल हैराण सोनू सूदला ट्रोल करण्याचा प्रयत्न फसला, अभिनेत्यानं युजरला दिलं सडेतोड उत्तर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या