बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा क्रिकेटचा फार मोठा चाहता आहे. अक्षय वेळात वेळ काढून क्रिकेट पाहतो. त्याची ही गोष्ट ट्विंकल फारशी आवडत नाही.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा क्रिकेटचा फार मोठा चाहता आहे. अक्षय वेळात वेळ काढून क्रिकेट पाहतो. त्याची ही गोष्ट ट्विंकल फारशी आवडत नाही.
अक्षयचं हे क्रिकेट प्रेम त्याच्या सहा वर्षाच्या मुलीलाही लागलं आहे. तीही क्रिकेटचे सामने मन लावून पाहते. पण या सगळ्यात अक्षयच्या मुलाला क्रिकेट अजिबात आवडत नाही.
लंडनमध्ये झालेल्या स्टार स्पोर्ट्स फिलिप्स हू क्रिकेट लाइव्हमध्ये अक्षय गेला होता. यावेळी त्याने आरवला क्रिकेट आवडत नसल्याचं म्हटलं.
अक्षय पुढे म्हणाला की, ‘माझ्या मुलाला क्रिकेट अजिबात आवडत नाही. पण निताराला हा खेळ आवडतो. ती फक्त सहा वर्षांची आहे.’
आरवला क्रिकेट आवडत नाही याचं मुख्य कारण म्हणजे मी खूप क्रिकेट पाहत असतो. विशेष म्हणजे मी क्रिकेट जास्त पाहतो म्हणून निताराही पाहते आणि तिला आता यात आवड निर्माण झाली आहे.
दरम्यान, अक्षयला त्याचे जुने दिवस आठवले, जेव्हा तो मनोसोक्त क्रिकेट खेळायचा. याबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की, ‘मी शाळेत क्रिकेट खेळलो आहे. अनेकदा खेळाडू चांगल्या फलंदाजीसाठी किंवा गोलंदाजीसाठी निवडले जातात. पण माझं क्षेत्ररक्षण पाहून मला निवडण्यात आलं होतं. लोकं म्हणायचे की हा मुलगा क्षेत्ररक्षणासाठी आहे. तो पळेल आणि चौकार थांबवेल.’
अक्षयच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘सूर्यवंशी’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफही असणार आहे.