मुंबई, 4 मे : नुकतंच लोकसभा निवडणुकीचं चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मात्र त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती अक्षय कुमारच्या नागरिकत्वाची. मुंबईमध्ये सर्व बॉलिवूड कलाकारांनी मतदान केलं एवढंच नव्हे तर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने सुद्धा मतदानाचा हक्क बजावला पण या सर्वात अक्षय कुमार कुठेही नजरेस पडला नाही. त्यमुळे अक्षयकडे भारताचं नागरिकत्व नाही या मुद्द्यानं पुन्हा एकदा जोर धरला आहे आणि अशातच अक्षय कुमारचा काही वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही दिवासांपूर्वी एका पत्रकारानं अक्षयला त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे का असा प्रश्न विचारला होता मात्र यावेळी अक्षयनं त्याला उत्तर देणं टाळलं. त्यानंतर अक्षयनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली होती ज्यात, त्याच्या भारतीय नागरिकत्वावर उठत असलेल्या प्रश्नांमुळे तो निराश असल्याचं त्यानं म्हटलं होतं. पण त्यानंतर त्याचा काही वर्षापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात अक्षय कुमार बॉलिवूडमधून रिटायर झाल्यावर मी कॅनडामध्ये स्थायिक होणार असल्याचं सांगताना दिसत आहे.
तुला पाहते रे : … म्हणून राजनंदिनी विक्रांतला देते होकार अक्षय कुमारच्या ट्विटर पोस्टवर त्याच्या चाहत्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही लोकांनी म्हटलं आहे की, नागरिकत्व महत्वाचं नाही तर तुमचं तुमच्या देशावर किती प्रेम आहे हे महत्वाचं आहे. तर काही लोकांनी, जर आपल्याकडे या देशाचं नागरिकत्व नसेल तर अशा लोकांनी देशभक्तीचे उपदेश देऊ नयेत असं म्हणत अक्षयवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये अक्षयनं असंही म्हटलं आहे कि, तो मागच्या 7 वर्षांपासून कॅनडाला गेला देखील नाही आहे. तसेच त्याच्यावर कोणी कितीही टीका केली तरीही देशाच्या विकासासाठी तो आपलं पूर्ण योगदान देईल असंही त्यानं त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे. कॅन्सरच्या उपचारांबाबत पहिल्यांदाच बोलले ऋषी कपूर, म्हणाले… काही दिवासंपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यानं अश्रय कुमार खूप चर्चेत होता. मागच्या काही वर्षांपासून देशभक्तिचा संदेश देणाऱ्या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व राखलं आहे. यावरून त्याच्यावर अनेकदा, तो फक्त सिनेमातून देशभक्तीचा उपदेश देतो मात्र सामाजिक कार्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग खूप कमी आहे, अशी टीकाही झाली होती. तर काहीनी अक्षयला संधीसाधू असंही म्हटलं होतं. जेव्हा एखाद्या कारणानं देशात देशभक्तीचं वातावरण निर्माण होतं त्याचा अक्षय पुरेपूर फायदा घेतो अशी टीका त्याच्यावर करण्यात आली होती. सलमानच्या नावानं फसवणुकीचा प्रयत्न, दबंगनं केलं चाहत्यांना सावध अमिताभ बच्चन यांच्या घरची ‘दीवार’ तुटणार की टिकणार?