मुंबई, 22 जानेवारी : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे एकनिष्ठ मावळे तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा 10 जानेवारीला रिलीज झाला. ‘तान्हाजी’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी’ सिनेमा रिलीज होऊन दोन आठवडे उलटले. मात्र तरीही प्रेक्षकांमध्ये सिनेमाची क्रेझ कायम असल्याचं दिसत आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे आता महाराष्ट्रात तान्हाजी सिनेमा टॅक्स फ्रि करण्यात आला आहे. ‘तान्हाजी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. सिनेमानं दोन आठवड्यातच 100 कोटीचा आकडा पार केला. या सिनेमानं आता पर्यंत 175 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यत ‘तानाजी’ चित्रपटाची कमाई पाहता अंदाज लावण्यात येत आहे की, या आठवड्यामध्ये चित्रपट 200 कोटींचा टप्पाही पार करू शकतो.
‘तान्हाजी’ सिनेमाबद्दल बोलायचं तर या सिनेमानं आतापर्यंत 175 कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाचं कलेक्शन 16 कोटींचं होतं. त्यामुळे या सिनेमासोबत शर्यतीत असलेला दीपिका पदुकोणचा छपाक सिनेमा केव्हाचं मागे पडला. आता तिसऱ्या आठवड्यात हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.