ऐश्वर्या राय बच्चन
मुंबई, 17 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसमोर अडचणी उभ्या राहिल्याचं दिसत आहे. अभिनेत्री आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचं समोर येत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रायला सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीला तहसीलदारांनी कशाबाबत नोटीस बजावली आहे सर्वांच्या मनात असा सवाल निर्माण झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या रायने आपल्या सिन्नरमधील जमिनीचा 22 हजारांचा कर थकवल्या प्रकरणी तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत ही थकबाकी न भरल्यास योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं नोटिशीत म्हटलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला नुकतंच सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये अभिनेत्रीने तब्बल 22 हजारांचा कर थकवल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्रीला हा कर नोटीस मिळाल्यापासून येत्या १० दिवसांच्या आत भरण्यास सांगितला आहे. अभिनेत्रीने असं न केल्यास अनुपालन कसूर झाल्याच्या कारणाने अभिनेत्रीविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 174अन्वये योग्य ती कारवाई करण्यात येईल असे नोटिशीत सांगण्यात आलं आहे. हे वाचा: Pallavi Joshi:मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीचा गंभीर अपघात; पती विवेकअग्निहोत्रींच्या सेटवरच घडली घटना नाशिकमधील सिन्नरच्या ठणगावजवळील आडवाडीत अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनची जमीन आहे. आडवाडीत डोंगराळ भागात तब्बल 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचा अभिनेत्रीने गेल्या एक वर्षांपासून सुमारे 22 हजार कर थकवला आहे. हा कर अभिनेत्रीला नोटीस मिळाल्यापासूनच्या पुढील 10 दिवसांत भरावा लागणार आहे. त्यामुळे ऐश्वर्या रायच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला नोटीस बजवण्यात आल्यामुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री आता कर भरणार की तिच्यावर पुढील कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच अभिनेत्रीचा निष्काळजीपणा तिला भोवल्याचं आता म्हटलं जात आहे. ऐश्वर्या रायसोबतच आता तब्बल 1200 मालमत्ता धारकांना नोटीशी बजावण्यात आल्या आहेत.मार्च अखेरीस वसुलीची सर्व उद्दिष्टये पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई केली जात आहे.