मुंबई, 13 जुलै : बच्चन कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. सर्वात आधी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिवाराची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि लेक आराध्या (Aaradhya ) यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. चौघांची प्रकृती ठिक आहे. सर्वच स्तरातून बच्चन कुटुंबीय लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान ऐश्वर्याला कोरोना झाल्याची बातमी कळताच विवेक ओबेरॉयनं (Vivek Oberoi) ट्वीट करत संपूर्ण परिवारासाठी प्रार्थना केली. विवेकनं ट्वीट करत, संपूर्ण परिवार लवकराच लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना करतो, असे ट्वीट केले आहे. केवळ विवेकचं नाही तर बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटीजनं बच्चन कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे. सध्या अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन रुग्णालयात आहेत, तर ऐश्वर्या आणि आराध्या यांना लक्षणं नसल्यामुळे त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. वाचा- बच्चन कुटुंबासाठी चाहत्यांची प्रार्थना; बिग बी अमिताभ यांनी हात जोडून मानले आभार
वाचा- बच्चन कुटुंबाबाबत Tweet करून झाली ट्रोल; असं काय म्हणाली जुही चावला प्रकृतीत सुधार, लवकरच डॉक्टर देणार अपडेट असे सांगितले जात आहे की अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा प्रकृतीत सुधार आला आहे. दोघांना सौम्य लक्षणं होती. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांना देण्यात येणारे डायट या दोघांनाही दिले जात आहे. या दोघांवर उपचार करणारे डॉक्टर अन्सारी काही वेळातच रुग्णालयात पोहचतील. त्यानंतर या दोघांचे चेकअप करून, त्यांच्या काही टेस्ट केल्या जातील. वाचा- कोरोनाबाबत जनजागृती करणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या घरात कसा घुसला कोरोना? अमिताभ यांनी मानले सर्वांचे आभार बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. त्यावर अमिताभ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ यांनी ट्वीट केलं आहे, “अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या आणि माझ्यासाठी ज्या सर्वांनी प्रार्थना केली त्या सर्वांचे मी हृदयापासून आभार मानतो. प्रत्येकाला प्रतिक्रिया देणं शक्य नाही. त्यामुळे मी हात जोडून सर्वांचे एकत्र आभार मानतो. तुम्ही दाखवले प्रेम आणि आपुलकीसाठी तुमचे खूप धन्यवाद”. अमिताभ ट्वीट करत आपल्या आरोग्यबाबत माहिती देत असतात. वाचा- सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात; या कलाकारांना व्हायरसची लागण