JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Rohan Joshi on Raju Srivastava: राजू श्रीवास्तवांबाबत बोलताना घसरली कॉमेडीयनची जीभ; निधनानंतर केली असभ्य शब्दात टीका

Rohan Joshi on Raju Srivastava: राजू श्रीवास्तवांबाबत बोलताना घसरली कॉमेडीयनची जीभ; निधनानंतर केली असभ्य शब्दात टीका

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. पण आता याच क्षेत्रात काम करणारा स्टँड-अप कॉमेडियन रोहन जोशीने त्यांच्या निधनानंतर असभ्य भाषेत टीका केली आहे.

जाहिरात

Rohan Joshi on Raju Srivastava:

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर :  कॉमेडियन राजू श्रीवास्तव  यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं  ते 58 वर्षांचे होते.  त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आता 21 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केलाआहे. पण आता  याच क्षेत्रात काम करणारा स्टँड-अप कॉमेडियन रोहन जोशीने त्यांच्या निधनावर केलेली टिप्पणी अनेकांना पटली नाही. राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर अतुल खत्री यांच्या पोस्टवर रोहनने प्रतिक्रिया दिली तेव्हा हा प्रकार घडला. कॉमेडियन रोहन जोशीची त्याच्या एका कमेंटमुळे सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. स्टँड-अप कॉमेडियन अतुल खत्रीने सोहळा मीडियावर राजू यांना  श्रद्धांजली देत लिहिले कि, ‘आरआयपी राजूभाई. तुम्ही अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान होता. जेव्हा कधी तुम्ही स्टेजवर जायचात  तेव्हा आग लावायचात. तुमची उपस्थिती अशी होती की जेव्हा जेव्हा लोकांनी तुम्हाला पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू येत असे. तुमच्या जाण्याने भारतीय स्टँड-अप कॉमेडी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.’’  या पोस्टवर कमेंट करत स्टँड-अप कॉमेडियन रोहनने राजू यांच्यावर टीका केली. त्याची या कमेंटमधील भाषा अनेकांना आक्षेपार्ह वाटली.

रोहनने  कमेंटमध्ये म्हटले आहे कि, ‘आपण काहीही गमावलं नाही. कामरा असो किंवा एखादं रोस्ट किंवा बातम्यांमध्ये आलेला एखादा कॉमिक असो, राजू श्रीवास्तव यांनी नवीन कॉमिक्सबद्दल वाईट बोलण्याची एकही संधी गमावली नाही, विशेषत: जेव्हा स्टँड अप कॉमेडीची नवी लाट पसरली होती. तो प्रत्येक न्यूज चॅनेलवर गेला आणि या नव्या कलेबद्दल वाईट बोलला. त्याने या गोष्टीला आक्षेपार्ह म्हटले कारण त्याला हे काय आहे ते समजत नव्हते आणि नवीन तारे उदयास येत होते. हेही वाचा - Raju Srivastava Funeral: पंचतत्वात विलीन झाले राजू श्रीवास्तव, लोकांनी लावला ‘अमर रहे’चा नारा पुढे तो म्हणाला कि, ‘त्याने काही चांगले विनोद सांगितले असतील पण त्याला कॉमेडीचे स्पिरिट किंवा आपण सहमत नसलो तरी एखाद्याच्या बोलण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्याबद्दलही त्याला काहीही समजले नाही.’

रोहनने वापरलेली भाषा नेटकऱ्यांना काही रुचली नाही. ‘एखाद्याच्या निधनानंतर अशी कमेंट करणं किती चुकीचं आणि असंवेदनशील आहे’, ‘प्रसिद्धीसाठी रोहनने हा प्रकार केला’  असे विविध रिप्लाय त्याला या कमेंटवर आले होते. अखेर रोहनने ही पोस्ट डिलिट केली, पण अजूनही अतुलच्या पोस्टवर रोहन जोशीला टॅग करत राजू यांचे चाहते त्याच्यावर टीका करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या