JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडनं मंदिरा बेदीला दिला मानसिक आधार; या सेलिब्रिटींनी घरी जाऊन घेतली भेट

बॉलिवूडनं मंदिरा बेदीला दिला मानसिक आधार; या सेलिब्रिटींनी घरी जाऊन घेतली भेट

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी राज यांच्या घरी हजेरी लावली.

0108

अभिनेत्री आणि टीव्ही अँकर मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं बुधवारी निधन झालं. राज यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. त्यामुळे मंदिराच्या काही जवळच्या कलाकार मित्रांनी तिची भेट घेतली.

जाहिरात
0208

मंदिरा आणि राज यांचा जवळचा मित्र रोहीत रॉयने सांगीतलं की, राज यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांच निधन झालं.

जाहिरात
0308

कौशल यांचे अंत्यसंस्कार दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत केलं . अभिनेते रोनित रॉय, समीर सोनी, आशीष चौधरी आणि दिनो मोर्या सहीत अनेकजन अत्यंविधीला सामील झाले होते.

जाहिरात
0408

बॉलीवूडसाठी कौशल यांच अचानक जाणं फारच धक्कादायक होतं. अनेकांनी मंदिराची घरी जाऊन भेट घेतली. अभिनेत्री मौनी रॉयनेही घरी जाऊन भेट घेतली.

जाहिरात
0508

बुधवारी संध्याकाळ पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मंदिराची घरी जाऊन भेट घेतली. ‘माई ब्रदर ... निखिल’ या चित्रपटाचे प्रोड्युसर देखील कौशल होते.

जाहिरात
0608

कौशल यांनी १९८९ साली कॉपीरायटर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहात होते.

जाहिरात
0708

अरशद वारसी, नेहा धूपिया, ओनिर आणि हंसल मेहतासह अनेक सेलिब्रीटींनी कौशल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

जाहिरात
0808

मंदिरा आणि राज १९९६ साली एकमेंकाना भेटले होते. त्यांनतर त्यांनी विवाह केला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या