JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 4 Blind men : 'एक नवा खेळ आणि चार नवे खेळाडू'; दगडी चाळ2 नंतर अंकुश चौधरीचा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

4 Blind men : 'एक नवा खेळ आणि चार नवे खेळाडू'; दगडी चाळ2 नंतर अंकुश चौधरीचा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

अंकुशचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असताना आता त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे अंकुशच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणीच असणार आहे.

जाहिरात

Ankush chaudhari

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑगस्ट : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकही बॉलिवूड चित्रपटाच्या मोहात न पडता मराठी चित्रपटाला  धमाकेदार यश मिळवून देत आहेत. दरम्यानच्या काळात आलेले  ‘पावनखिंड’ , चंद्रमुखी, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव या  सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली. तसेच ‘दगडी चाळ 2’, ‘टकाटक 2’ हे चित्रपट प्रदर्शित होताच   बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहेत.  आता आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नुकतेच  या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टवरूनच हा चित्रपट फारच इंटरेस्टिंग असणार अशी खात्री  होतेय. या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठीतील  4 आघाडीचे नायक या चित्रपटात  प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या नवीन चित्रपटाचे नाव ‘4 ब्लाइंड मेन’ असं असून त्यात मराठीतील सध्याचा आघाडीचा नायक अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकुशचा  ‘दगडी चाळ 2’ हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असताना आता त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा  करण्यात आलीये. त्यामुळे अंकुशच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणीच असणार आहे. अंकुशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

अंकुश चौधरीसोबतच या चित्रपटात क्षितीश दाते, संकर्षण कऱ्हाडे आणि शुभंकर तावडे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.या सर्वानी सोशल मीडियावर धमाकेदार पोस्टर शेअर करत त्याला ‘‘नरकाचे दरवाजे: काम, क्रोध, लोभ आणि ??? एक नवा खेळ… चार खेळाडू…क्षितीश दाते, संकर्षण कऱ्हाडे, शुभंकर तावडे आणि अंकुश चौधरी…सगळे सुटणार…? का सगळेच अडकणार…?’’ असं कॅप्शन दिले आहे. हे कॅप्शन वाचूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  या अभिनेत्यांसोबतच या चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. हेही वाचा - Me Honar Superstar: ‘या’ ग्रुपनं जिंकलं विजेतेपद, साकार केलं सुपरस्टार होण्याचं स्वप्न अंकुश चौधरीचा दगडी चाळ 2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.  त्यासोबतच त्याचे इतर चित्रपटावरही सध्या काम सुरु आहे. आता त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झालेत. शिवाय चित्रपटातील क्षितिश दाते हा अभिनेता नुकताच धर्मवीर चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता. तसेच संकर्षण कऱ्हाडेने आतापर्यंत छोटा पडदा गाजवला होता आता त्याला चित्रपटात नवींन भूमिकेत बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या