मुंबई, 22 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्रा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. राज कुंद्राचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली. शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. अशातच आता राज कुंद्राने पॉर्न प्रकरणातून सुटल्यानंतर एका वर्षानंतर आपले मौन सोडलं आहे. याविषयी एक ट्विट करत राज कुंद्राने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. राज कुंद्राने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘आर्थर रोडमधून रिलीज होऊन आज पूर्ण वर्ष झाले आहे. ही काळाची बाब आहे, मला लवकरच न्याय मिळेल. सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. मला माझ्या शुभचिंतकांचे आणि ट्रोल करणार्यांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी मला मजबूत केले’. यासोबत ट्विटमधील फोटोमध्ये लिहिलंय की, ‘जर तुम्हाला संपूर्ण गोष्ट माहिती नसेल तर तुम्ही शांत बसा’.
दरम्यान, गेल्या वर्षी जूनमध्ये राज कुंद्रा यांना अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याशिवाय त्याच्यावर फसवणुकीचाही आरोप आहे. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी याबाबत कधीच काही बोलले नाही पण आता वर्षभरानंतर त्यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. राज कुंद्राने शेअर केलेल्या पोस्टवर सध्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. हेही वाचा - मुंबई-कानपुर नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार राजू श्रीवास्तववर अंत्यसंस्कार; काय आहे कारण? अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी राज कुंद्राचं नाव समोर आल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर आरोप केले होते. मात्र मला जबरदस्तीने या प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचं राज कुंद्रानं म्हटलं. देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचंही यावेळी त्याने म्हटलं. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.